corona infection for one more congress mla in kolhapur 
कोल्हापूर

काँग्रेसच्या आणखी एका आमदारांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांचा कोरोनाचा अहवाल शुक्रवारी (ता. २१) पॉझिटिव्ह आला असतानाच कोरोनाविरोधातील लढ्यात आघाडीवर असलेले काँग्रेसचे दुसरे आमदार चंद्रकांत जाधव यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. श्री. जाधव यांनीच स्वतः ट्विट आणि सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून संपर्कातील लोकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शुक्रवारी दक्षिणचे आमदार श्री. पाटील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्यापासून श्री. जाधव हेही शहरातील कोविड सेंटरमधील सुविधा, सीपीआरमधील डॉक्‍टरांबरोबरच रुग्णांना येणाऱ्या अडचणी, महापालिकेच्या नियोजनात आघाडीवर होते. स्वतःची काळजी घेत त्यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात आघाडीची भूमिका घेतली होती. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. दोघांच्या संपर्कात श्री. जाधव होते, त्यामुळे त्यांनीही तपासणी करून घेतली. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत; पण खबरदारी म्हणून त्यांनी दिलेल्या स्वॅबचा अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह आला. 

सोशल मीडियावर त्यांनी माहिती देताना आपला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कातील लोकांनी तपासणी करून घ्यावी, माझी प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबासह कारखान्यातील कामगारांचेही स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. श्री. जाधव यांना तातडीने शास्त्रीनगर परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT