covid centers 67 percent beds empty in kolhapur the corona patients decreases in district 
कोल्हापूर

कोल्हापुरकरांसाठी दिलासादायक बातमी : रुग्णसंख्येत होतीये घट

सदानंद पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने कोविड केअर सेंटरमधील तब्बल ६७ टक्‍के बेड रिकामे आहेत. यामध्ये २५९ ऑक्‍सिजन बेडचाही समावेश आहे. पंधरा दिवसांपूर्वी बेड मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. बेड नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला. मात्र, बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कमी रुग्ण असलेल्या कोविड सेंटरच्या ठिकाणी पोस्ट कोविडचे उपचार करण्याचे नियोजन सुरू आहे.

सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. यात सर्वाधिक रुग्ण सप्टेंबरमध्ये ८०० पासून १३०० पर्यंत वाढले. आठ ते दहा हॉस्पिटल फिरूनही बेड मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. दहनासाठी जागा उपलब्ध झाली नाहीच तर जागा उपलब्ध झाल्यानंतर दहन करण्यासाठी शेणीही कमी पडू लागल्या, अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनाची महामारी रोखण्यासाठी जिल्ह्यात ५१ सेंटर उभारली. यामध्ये बाधित रुग्णांसाठी तसेच संशयित रुग्णांसाठी एकूण ४८३५ बेडची व्यवस्था केली.

सप्टेंबरच्या सुरुवातीस सर्व बेड आरक्षित होते. एका रुग्णास डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच दुसरा रुग्ण दाखल केला जाता होता. मात्र ही स्थिती मागील चार-पाच दिवसापासून कमी झाली आहे. गठ्ठ्याने दाखल झालेले रुग्ण त्याचपद्धतीने कोरोनामुक्‍त होऊन घरी जात आहेत. त्यामुळे बेड रिकामे होण्याची संख्याही अधिक आहे. रुग्णांना बेड मिळत असल्याने तक्रारींची संख्याही कमी झाली आहे. बेड मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये जे भीतीचे सावट होते तेही काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. 

जिल्ह्यातील कोविड सेंटर             ५१
एकूण बेडची संख्या                 ४८३५
आरक्षित बेडची संख्या             १५५५
रिकाम्या बेडची संख्या             ३२८०

ऑक्‍सिजन रिकामे बेड              २५९

"रुग्णसंख्या कमी होत असल्याने आरोग्य विभागालाही दिलासा मिळाला आहे. ज्या कोविड सेंटरमध्ये थोडेच रुग्ण आहेत त्यांना शेजारील सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे. रिकामी राहणारी कोविड सेंटर पोस्ट कोविडच्या रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध करून देणार आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे."

- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या रामकुंडात चपला आणि कपडे फेकाफेकी प्रकरणावर गुन्हा दाखल

Bribery Case Police : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ७ लाखांची लाच, खाकीला बदनाम करणाऱ्या शेख, कांबळेचा रुबाब उतरला

Bee Attack:परीक्षा संपताच विद्यार्थ्यांवर आग्या मधमाश्‍यांचा हल्ला; वाकी शिवणे येथील घटना; वाहनचालकाचा जीव धाेक्यात अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT