कोल्हापूर : जिल्ह्यात कोविड प्रतिबंध लसीकरणच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील 11 हजार 413 तर दुसऱ्या टप्प्यातील 874 नागरिकांनी लस घेतली. आज अखेर जिल्ह्यात एकूण पहिल्या टप्प्यातील 1 लाख 20 हजार 504 दुसऱ्या टप्प्यातील 13 हजार 680 नागरिकांनी डोस घेतले.जिल्ह्यात सर्वाधिक आत्तापर्यंत करवीर तालुक्यात 41636, तर सर्वात कमी गगनबावडा तालुक्यात866 नागरिकांनी लस घेतली आहे.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सात लाख 30 हजार 49 नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य विभागात विभागाशी संबंधित काम करणारे 38 हजार 256 फ्रन्टलाइन वर्कर 29 889 45 ते 60 वयोगटातील विविध आजाराने ग्रस्त असलेले नागरिक एक लाख 52 हजार 948 तर 60 वर्षावरील नागरिकांना 5 लाख 9 हजार इतकी उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
तालुका निहाय आज अखेर पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या पुढील प्रमाणे:
आजरा 4272,भुदरगड 4593, चंदगड 5964 ,गडहिंग्लज 8386, गगनबावडा 866, हातकणंगले 18274 ,कागल 4905 करवीर 41636, पन्हाळा 6397, राधानगरी 10231, शाहूवाडी 6375 शिरोळ 8605.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.