crime case in ichalkaranji from whatsapp status police arrested in kolhapur 
कोल्हापूर

'मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी', पॅरोलवरील आरोपीच्या व्हिडिओ स्टेटसची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : व्हॉट्‌स ॲप स्टेटस्‌वर दहशत माजविण्याच्या दृष्टीने मजकूर ठेवल्याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेव (वय २७, रा. भोने माळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

शिवाजीनगर पोलिसांचे गुन्हे शोध पथक व पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने त्याला १५ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वासुदेव याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.

वर्षभरापूर्वी ईदगाह मैदानाजवळ दीपक कोळेकर याचा वासुदेवसह त्याच्या टोळीने खून केला होता. यातील संशयित जामिनावर सुटले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर जर्मनी टोळीने सशस्त्र हल्ला केला होता, तर कोळेकर याच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झाले असून, या पार्श्‍वभूमीवर वासुदेव याने मोबाईलमध्ये व्हॉट्‌स ॲप स्टेटस्‌वर ‘मर्डरचे एक वर्ष पूर्ण.. आता दुसऱ्या वादळाची तयारी’ असा दहशत माजविणारा मजकूर ठेवला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडण्याची शक्‍यता असल्याने सोमवारी रात्री त्याला प्रतिबंधात्मक कारवाईखाली पोलिसांनी अटक केली. 
त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. 

"दहशत माजविणारा मजकूर मोबाईल स्टेटस्‌वर, फोटो, शस्त्राचे फोटो ठेवल्यास व सोशल मीडियावर व्हायरल केल्यास तत्काळ कठोर कारवाई करण्यात येईल."

- बी. बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Rare Earth Discovery : विदर्भाचं भाग्य उजळणार! 'वेकोलि'च्या खाणीत सापडला मौल्यवान खनिजांचा साठा; पाहा कोणत्या 6 खाणी आहेत या यादीत

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद! तुमच्या शहरातील सुट्ट्या कधी ते पाहा

Latest Marathi News Live Update : होळीच्या पार्श्वभूमीवर 280 जण तडीपार; पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

Pradosh vrat 2026: यंदा त्रयोदशीला महादेवाच्या आवडत्या फुलाशी संबंधित 'हा' उपाय करा, धनाचे सर्व दरवाजे उघडतील

Kolhapur Airpot : कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा एक एप्रिलपासून; वाढत्या प्रवासी संख्येमुळे विमानतळ विस्ताराला गती

SCROLL FOR NEXT