crime case in kolhapur ichalkaranji attack cloth shop employees 
कोल्हापूर

कोल्हापूर : इचलकरंजीत कामगारावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला; हल्लेखोर पसार

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरातील महेश सेवा समिती समोर असलेल्या इराणी बिल्डींगमध्ये कापड पॅकिंग करणाऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने खूणी हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रेमाराम चौधरी (वय 42) असे त्याचे नाव आहे. चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हल्लेखोर पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. काही दिवसांपासून शहरात खूण आणि खूणी हल्ल्याचे सत्र सुरू असताना या खूणी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इराणी बिल्डिंगमध्ये चौथ्या मजल्यावर प्रेमाराम चौधरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते कापड पॅकिंग करणाऱ्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करतात. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने बिल्डिंगच्या बंद गेटचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केला. डोक्यावर आणि अंगावर वार केल्याने रक्तबंबाळ अवस्थेत चौधरी मदतीसाठी बिल्डिंगमध्ये धावू लागले. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

US Missile Test: ‘डुम्सडे मिसाईल’ची यशस्वी चाचणी; अमेरिकेकडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

Loco Pilot Leaves Train : ट्रेन अर्ध्यातच उभी करुन निघून गेला लोको पायलट; होळीच्या गर्दीत प्रवाशांना ३ तास सहन करावा लागला मनस्ताप

Latest Marathi News Live Update : इराण युद्धाचा पाकिस्तानला तगडा झटका

SCROLL FOR NEXT