Damage Agriculture In Kamewadi, Chinchane Area Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गव्यांचे कळप कुंपन तोडून शेतात

अशोक पाटील

कोवाड : चिंचेणे व कामेवाडी परिसरातील ऊस पिकात गव्यांचा धुडगूस सुरू आहे. शेतांचे कुंपन तोडून गव्यांचे कळप शेतात घुसत आहेत. यामुळे राखणीला असलेल्या शेतकऱ्यांत धडकी भरली आहे. गवे उसाच्या लुसलुसीत पालवीवर ताव मारुन जंगलात जात असल्याने शेती करायची कशी असा प्रश्‍न शेतकरी करत आहेत. गव्यांचा प्रश्‍न नित्याचा झाला असून वनविभागाकडून शेतकऱ्यांना मदत होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

चिंचणे जंगलाच्या पायथ्याशी पूर्वेकडच्या बाजूला ताम्रपर्णी नदीकाठावर चिंचणे, कामेवाडी व राजगोळी बुद्रुक व राजगोळी खुर्द येथील शेतकऱ्यांची ऊस शेती आहे. जंगलातील गवे रात्रीच्यावेळी हमखास शेतात उतरतात. पिकावर ताव मारून नदीतील पाणी पिऊन पुन्हा जंगलात जातात. जंगलात गव्यांचे तीन ते चार कळप असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

12 वर्षापूर्वी गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने जंगलाच्या पायथ्याशी चर मारली होती. पण गव्यांनी पर्यायी मार्ग शोधल्याने त्याला यश आले नाही. येथे हजारो हेक्‍टर ऊस पिकाची शेती असल्याने शेतकऱ्यांनी गव्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. रात्रीच्यावेळी राखण करण्यासाठी शेतात मचाण मारल्या आहेत. डब्यांचा आवाजांसह विविध उपायांतून गव्यांना हुसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी लाकडी व तारेचे कुंपन केले आहे.

कुंपनात लोखो रुपयांची गुंतवणूक केली असतानाही गवे कुंपन मोडून शेतात धुडगूस घालत आहेत. गव्यांच्या तावडीतून पिकाला मोठे करण्यात येथील शेतकऱ्यांचा दर वर्षी कस लागतो. चांगले पीक काढण्यासाठी शेतकरी वेळेवर पाणी व भांगलन, कोळपणी करुन महागड्या खताचे डोस देतो. पण उसाचे पीक जरा चांगले वाढ की गव्यांचे कळप त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे शेतकरीही हताश झाले आहेत. वनविभागाकडून गव्यांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. नासधूस झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

पंचनामे करावेत
गव्यांच्या भरोशावर आमची शेती आहे. वनविभागाकडून कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने आम्हाला वैताग आला आहे. शेतीच्या रक्षणासाठी मोठा खर्च होत आहे. त्यामुळे ही शेती फायद्याची नसून तोट्याचीच झाली आहे. वनविभागाने किमान नासधूस झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई तरी मिळवून द्यावी. 
- विक्रम पाटील, शेतकरी, राजगोळी बुद्रुक 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT