Danoli crime suspects Absconding kolhapur news 
कोल्हापूर

खुनातील संशयितांची पोलिसांच्या हातावर तुरी

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर)  ः गुटखा चोरीच्या संशयावरून अमानुष मारहाणीत अर्जुन जगदीश (वय 27, रा. खटिरवा स्टुडिओ बंगळूर, कर्नाटक) याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींनी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी दिली आहे. महेश दळवी (दानोळी), अभिजित धडेल (कोथळी), समीर जहांगीर पट्टेकरी (इचलकरंजी), साजिद पाटणी (रा. मुंबई, सध्या रा. अप्सरा हॉटेल मिरज) हे अद्याप फरार आहेत. बंगळूरमधून अथणी रोड मार्गावर गुटख्याची वाहतूक करताना कंटेनरमधील गुटख्याची पोती चोरीला गेल्याच्या संशयावरून मृतासह अन्य दोघांना दानोळी येथील फार्म हाऊसवर आणून त्यांच्यावर अमानुष मारहाण केली होती.

13 दिवसांपासून संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. कोल्हापूर, इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश दळवी याच्या फार्म हाऊसमध्ये गुटखा चोरीच्या संशयावरून तिघांना अमानुष मारहाण झाली होती. विजेचा शॉक देत, हॉकी स्टिक, लाकडाच्या दांडक्‍याने मारहाण करून जखमांवर पेट्रोल आणि चटणीचे पाणी टाकून मारहाण केली होती. मारहाणीत अर्जुन जगदीश याचा मृत्यू झाला होता. 22 जानेवारीला ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाला वाचा फुटली. अंकली टोल नाक्‍यावर नाकाबंदीत तीन वाहनांसह मृतदेह, दोघे जखमी आणि सहा संशयितांना ताब्यात घेतले होते, तर आणखी चार जण फरार आहेत.

आणखी दोघा जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या आणखी चौघांच्या शोधासाठी पोलिस कसून शोध घेत आहेत. मृत अर्जुन हा बंगळूरमध्ये पेप्सीच्या कारखान्यात काम करून उदरनिर्वाह करत होता. गुटखा चोरीच्या प्रकरणात त्याचा कितपत सहभाग होता याबाबत पोलिस साशंक आहेत. अटकेत आरोपींकडून कसून चौकशी केली जात असून फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT