कोल्हापूर

कोल्हापुरात तूर, मसूर, उडीद डाळ साठ्यावर निर्बंध

सुनील पाटील

डाळीवरील साठा निर्बंध 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत लागू राहणार आहे.

कोल्हापूर: केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाऊक, किरकोळ विक्रेते तसेच मिल धारकांनी तूर, मसूर, उडिद, चणा या डाळीचा साठा करू नये, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिले आहेत. डाळीवरील साठा निर्बंध 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत लागू राहणार आहे. 

श्री कवितके म्हणाले, केंद्र सरकारने 19 जुलैला दिलेल्या हा निर्बंध लागू केला आहे. साठा निर्बधामध्ये व्यापाऱ्याकडे एकाच प्रकारच्या डाळीचा 200 मेट्रीक टनापेक्षा जास्त साठा ठेवू नये. किरकोळ व्यापाऱ्याकडे कमाल 5 मेट्रीक टन असावा. मिलर्सकडे गेल्या 6 महिन्यातील असलेले उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 50 टक्के यामध्ये जे जास्त असेल ती कमाल साठा मर्यादा असेल. कायदेशीर घटकांकडे असणारा तूर, मसूर, उडिद , चणा या डाळीचा साठा 19 जुलै 2021 च्या अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त असल्यास तसे Fcainfoweb.nic.in या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर जाहिर केले आहे.

अतिरिक्त् डाळीचा साठा केंद्र अधिसूचनेपासून 30 दिवसाच्या आत ठरवून दिलेल्या साठयाच्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक राहील. हे आदेश डाळीच्या आयातदारांना लागू असणार नाहीत. परंतु त्यांना त्याच्याकडे उपलब्ध असणा-या डाळीच्या साठयाची माहिती fcainfoweb.nic.in या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर जाहिर करणे बंधनकारक राहील. सर्व संबंधितांनी केंद्रशासनाच्या अधिसुचनेप्रमाणे सक्त अंमलबजावणी करावी. या तरतुदीचे उल्लंघन करणा-या व्यापा-याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असा ही इशारा कवितके यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

Snake Bite Death : आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हिरावला! नागाच्या दंशात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत, जिन्यात खेळताना दबा धरून बसलेला साप

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Kolhapur Fraud Case : कोल्हापुरात 'दामदुप्पट'च्या नावाखाली 3 कोटींचा गंडा; पुणे गाठून मास्टरमाईंड वैशाली गुरवला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे श्रीमंता बाजार?

Latest Marathi News Live Update : एप्रिलच्या सुरुवातीलाच जलसाठा निम्म्यावर; पाणीटंचाईचा धोका वाढला

SCROLL FOR NEXT