अकरावी प्रवेश Esakal
कोल्हापूर

Education : ‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

शहरस्तरीय अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास समितीने मुदतवाढ दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरस्तरीय अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास समितीने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उद्या (ता. १९) सायंकाळी पाचपर्यंत अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांची मागणी आणि सीबीएसई बोर्डाच्या काही विद्यार्थ्यांना अद्याप शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाणिज्य इंग्रजी माध्यम आणि विज्ञान विद्याशाखेच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरण्यास १४ जूनपासून सुरुवात झाली. त्यात दिवसागणिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली.

या प्रक्रियेत अर्ज करण्याचा आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत एकूण सहा हजार ३८४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. त्यात विज्ञान विद्याशाखेचे पाच हजार २५६, तर वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या एक हजार १२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत उद्या सायंकाळी पाचपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नाही. त्यांनी या मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे करण्यात आले आहे.

दहावी पुरवणी परीक्षेसाठी करा अर्ज

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वाढविण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २१ जून, तर विलंब शुल्कासह २२ ते २५ जूनपर्यंत अर्ज करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT