कोल्हापूर

Father's Day : ‘प्रियंका’ करणार ऑलिंपिकमध्ये देशाचे नेतृत्व

राजेश मोरे

कोल्हापूर : मुलगी ‘प्रियंका’ (Priyanka)व्हॉलीबॉलमध्ये (Volleyball)स्टार खेळाडू बनावी, तिने ऑलिंपिकमध्ये देशाचे नेतृत्व करावे. या तळमळीने वडील प्रकाश तुकाराम मांडवकर पोलिस दलातील कर्तव्य सांभाळत तिला धडे देत आहेत. मुलीची १६ वयोगटातील राज्य व्हॉलीबॉल संघात झालेली निवड हे त्यांच्या स्वप्नपूर्तीचे पहिले पाऊल आहे. (fathers-day-special-priyanka-lead-the-country-in-the-olympics-kolhapur-news)

बाचणी (ता. कागल) येथील प्रकाश मांडवकर यांचे वडील सैन्य दलातून निवृत्त झाले. आई गृहिणी. त्यांचे १२ वीपर्यंतचे शिक्षण गावीच झाले. व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील हे याच गावचे. शालेय वयात मांडवकर हे त्यांच्या संपर्कात आले. पाटील यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी व्हॉलीबॉलमधील कौशल्य आत्मसात केले. त्यांनी शालेय, महाविद्यालयीन स्पर्धाही गाजवल्या.

गावातील एस. एस. सडोलकर यांच्यासह आजी-माजी खेळाडूंच्या पुढाकारातून ‘आदर्श क्रीडा मंडळ’ त्यांनी सुरू केले. येथे ग्रामीण खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम ते सहकाऱ्यांबरोबर करू लागले. मांडवकर हे १९९७ मध्ये पोलिस दलात व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून रुजू झाले. सध्या ते इस्पुर्ली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. या दोनवेळा कर्णधारपदाचीही धुरा सांभाळली.

क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इतकी व्हॉलीबॉलला देशात लोकप्रियता मिळालेली नाही. ती मिळून द्यायची असेल तर या खेळातील स्टार खेळाडू तयार झाले पाहिजेत. हे मांडवकरांनी जाणले. मुलगी प्रियंका चार वर्षाची असल्यापासून ती मैदानात जाऊ लागली. मुलीची व्हॉलीबॉलची आवड वडिलांनी ओळखली. तिला व तिच्या मैत्रिणींनाही व्हॉलीबॉलचे धडे देण्यास सुरवात केली. ते सकाळी किंवा सायंकाळी किमान दीड तास तिच्यासह इतर खेळाडूंचा सराव घेतात. शारीरिक तंदुरुस्तीबरोबर व्हॉलीबॉलमधील कौशल्याचे धडे देतात. नववीत असताना प्रियंकाने १६ वयोगटातील महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात स्थान मिळवून वडिलांच्या कष्टाचे चीज केले.

प्रशिक्षक, मित्र अशा दुहेरी भूमिकेत व्हॉलीबॉलचे धडे देणाऱ्या वडिलांचे ‘मी व्हालीबॉल स्टार खेळाडू बनावे’ हे स्वप्‍नपूर्ण करायचे, हेच माझे ध्येय आहे.

-प्रियंका मांडवकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT