Five friends from the same village joined the army at the same time  
कोल्हापूर

एकाच गावातले पाच मित्र, एकाचवेळी झाले लष्करात भरती....

तानाजी बिरनाळे

मांगूर (निपाणी) - सध्याचे युग मोबाईल, सोशल मीडियाचे असल्याचे मानले जाते. युवापिढी त्यात गुरफटल्याची ओरड सुरू आहे. पण मांगूर येथील तरूणाईने वेगळाच आदर्श घालून दिला आहे. देशसेवेच्या वेडाने प्रेरित होऊन एकाचवेळी येथील पाच युवक लष्करात भरती झाले आहेत. त्यात पंकज रूपे, चेतन बिळगे, सुमित गायकवाड, ओमकार जाधव, प्रकाश सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या निवडीमुळे गावात एकप्रकारे दिवाळी साजरी झाली.

लष्करात निवड झालेले पाचही तरुण सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. तीन-चार वर्षांपासून ते देशसेवेत भरती होण्यासाठी कष्ट करीत आहेत. त्यांना आता कष्टाचे फळ मिळाले आहे. या भरतीची माहिती कळताच गावात ठिकठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी झाली. या तरुणांबरोबरच अनेक तरुण व १५ ते २० वयोगटातील मुले पहाटे पाच आणि सायंकाळी पाच वाजले की येथील श्री भैरवनाथ हायस्कूलमधील पटांगणवर येतात. ते मैदानावर धावण्यासह अन्य सराव करतात.

तीन वर्षांपासून देशसेवेसाठी लष्करात भरती होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. यासाठी आई-वडील, मामा यांच्यासह मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.
-पंकज रूपे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT