Gas cylinder explodes in Rajendra Nagar crime marathi news 
कोल्हापूर

राजेंद्र नगरात गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघे जखमी

राजेश मोरे

कोल्हापूर : राजेंद्र नगर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा आज सकाळी अचानक स्फोट झाला. यात एका लहान मुलासह दोघे जण जखमी झाले. हा स्फोट इतका मोठा होता की घराची भिंत कोसळली. स्लॅबला तडे गेले. दरवाजा मोडून निघाला. त्याचबरोबर शेजारील घरांचेही मोठे नुकसान झाले. मोठ्या आवाजाने शेजारील नागरिक जमा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, 


राजेंद्र नगर येथे कुमार लाटवडे हे कुटुंबा सोबत राहतात.  आज सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. यात त्यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर शेजारील चार ते पाच घराच्या स्लॅबचे तडे गेले. एका घराची भिंत कोसळली. त्याखाली एक जण सापडला. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने शेजारील नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर आले. घटनास्थळी माजी नगरसेवक महेश वासुदेव, रुपाराणी निकम. संग्राम निकम यांनी मदत कार्यास सुरुवात केली. त्यांनी अग्निशामक दल, 108 रुग्णवाहिका, महावितरण, महापालिका विभाग याला याची माहिती दिली.

जखमी कुमार लाटवडे त्यांचा मुलगा वेदांत यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. ढिगार्‍याखाली सापडलेले राजू सोनुले यांना बाहेर काढले. लाटवडे यांच्यासह शेजाऱ्यांच्या घरातील साहित्य बाहेर काढण्यास मदत केली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती मदत सुरू केली. यात लाखोंचे नुकसान झाले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT