Help To Orphan Girls In Chandgad Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

लग्न खर्चाला फाटा देऊन अनाथ मुलींना मदत

सुनील कोंडुसकर

चंदगड : दाटे (ता. चंदगड) येथील ऋषीकेश सातार्डेकर या तरूणाने लग्न कार्यातील रुढी, परंपरांना फाटा देत गावातील अनाथ मुलींना आर्थिक मदत केली. अर्थातच त्यासाठी पत्नी शुभांगी यांचीही साथ मिळाली. त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत स्वागत होत आहे. 

लग्न सोहळा म्हटले की मंडप, लाईटींग, बेंजो यासह पाहुण्यांना पेहरावा, जेवणावळ, रात्री वरात यावर लाखो रुपये खर्च होतात. चंदगड तालुक्‍यात अजूनही रुढी, परंपरा पाळल्या जातात. त्यातून नाहक पैसा खर्च होतो. अशा वेळी नवा विचार करून तो अमलात आणणे काहीसे धाडसाचेच म्हणावे लागेल. सातार्डेकर दांपत्याने मात्र हे धाडस केले. ऋषीकेश व शुभांगी यांनी श्री क्षेत्र श्रीपादवाडी (ता. चंदगड) येथे साध्या पध्दतीने विवाह केला.

लग्नकार्यात अन्य खर्चाला फाटा देऊन बचत केलेली रक्कम समाजकार्यासाठी वापरायची असे आधीच ठरले होते. पाटणे (ता. चंदगड) येथील मयुरी, ममता व सुवर्णा बागवे या तीन सख्या बहिणी आई- वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाल्या आहेत. सद्या त्या दाटे येथेच मामा व मावशीकडे राहतात. या मुलींच्या शिक्षणासाठी आपण काही हातभार लावावा, असे ठरवून त्यांनी लग्न कार्यातून बचत केलेले रक्कमेपैकी पाच हजार रुपये संबंधित मुलींना दिले. 

वंचितांना मदत केल्यास सर्वजण सुखी
खरंतर लग्न कार्यात दोन कुटुंबांचे ऋणानुबंध गुंफले जातात. त्याचा मोठा गाजावाजा करण्याची गरज नसते. प्रत्येकाने लग्न कार्यातील नाहक पैसा वाचवून समाजातील वंचितांना मदत केल्यास सर्वजण सुखी, समाधानी होतील. 
- शुभांगी व ऋषीकेश सातार्डेकर, नव दांपत्य, दाटे 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

निवेदिता सराफ करतात ते इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? किती ते किती वाजेपर्यंत करतात? म्हणाल्या, 'मी कायम...'

SCROLL FOR NEXT