husband wife case in belgaum wife killed in case of belgaum 
कोल्हापूर

जीवनसाथीच झाला वैरी ; पतीनेच केला पत्नीचा घात

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा पोटात चाकू भोसकून खून केला. शुक्रवारी (१८) रात्री ऑटोनगर येथे ही घटना घडली. सखुबाई पुंडलिक लमानी (वय ३२, मूळ रा. रामापूर लमानी तांडा सध्या रा. ऑटोनगर असे) खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. माळमारुती पोलिसांनी पती पुंडलिक याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मूळचे रामपूर लमानी तांडा येथील दाम्पत्य कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून ऑटोनगर येथे भाड्याच्या घरात वास्त्यव्यास आहेत. मात्र, पत्नी सखुबाईवर पती पुंडलिक याचा संशय होता. त्यामुळे वरचेवर त्यांच्यात खटके उडत होते.

काल रात्री पुंडलिकने अचानक पत्नीबरोबर भांडण काढून पोटात चाकू भोसकल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच ठार झाली. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला. मारेकरी पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास चालविला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier funeral: ११ महिन्यांच्या चिमुकल्यामुळे मने हेलावली! जवान अर्जुन जाधव यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप, शहापूरवर शोककळा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १३ जून २०२६ ते १९ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

स्वाभिमान, अभिमान व अहंकार : संत एकनाथ महाराज

आजचे राशिभविष्य - 13 जून 2026

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT