कोल्हापूर

हुश्श ः मराठा कॉलनीत सुटकेचा निःश्‍वास

प्रतिनिधी

कोल्हापूर ः कसबा बावडा येथील मराठा कॉलनीतील कोरोनाचा अहवाल यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचा 14 दिवसांनंतरचा दुसरा अहवाल आज निगेटिव्ह आल्याने या कॉलनीतील रहिवाशांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. या महिलेसह तिच्या कुटुंबातील पाच जणांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने आता रहिवाशांना कॉलनीच्या प्रवेशद्वारावर लावलेले बॅरिकेड्‌स हटवून रस्ते कधी मोकळे होणार, याची प्रतीक्षा आहे. 
राज्यात आणि देशात लॉकडाउन असताना सातारा ते कोल्हापूर असा एका रुग्णवाहिकेतून प्रवास केलेल्या या 60 वर्षीय महिलेला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसू लागल्याने सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही लक्षणे कोरोनाशी संबंधित असल्याने त्यांना 4 एप्रिलला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचदिवशी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. 6 एप्रिलला या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर कसबा बावडा, लाईन बाजार परिसरात एकच खळबळ उडाली होती. 
14 दिवस ही महिला राहत असलेल्या परिसरातील रस्ते बॅरिकेड्‌स लावून बंद करण्यात आले आहेत. जीवनावश्‍यक वस्तू वगळता इतर काहीही या कॉलनीत दिले जात नाही आणि कॉलनीतील रहिवाशांना बाहेरही सोडले जात नाही. या महिलेचा पहिला अहवाल येऊन 14 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या तपासणीसाठी दोन दिवसांपूर्वी तिचा स्वॅब मिरजेला तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला. सोशल मीडियाद्वारे ही माहिती बावडा, मराठा कॉलनी, लाईन बाजार परिसरात समजताच या परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 
कॉलनीत रुग्ण सापडल्याने या परिसरातील रस्ते गेल्या 14 दिवसांपासून पूर्ण "सील' करण्यात आले. या महिलेचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तत्पूर्वीच तिच्या कुटुंबातीलही पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे आता हे रस्ते खुले होण्याची प्रतीक्षा या परिसरातील नागरिकांना आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

Ancient Heritage Discovery : भुदरगड तालुक्यात सापडला मध्ययुगीन काळातील दुर्मीळ ठेवा; ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर आढळल्या गूढ शिळा, शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात

Abhijit Deepke: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही: अभिजित दीपके, कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावीच लागणार

Monsoon Alert: मॉन्सूनचा वेग मंदावणार; १५ जूनपर्यंत पेरणीची घाई टाळा, शेतकऱ्यांना सरकारचा इशारा

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

SCROLL FOR NEXT