If There Is No Mask, The Customer Will Be Fined Rs 100 And The Shopkeeper Rs 200 Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

मास्क नसल्यास ग्राहकास 100, दुकानदारास 200 रूपये दंड

अशोक पाटील

कोवाड : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ग्रामपंचायत, व्यापारी व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जेष्ठ नागरिकांसह व्यापारी वर्गाने कोरोनाची लस घ्यावी तसेच बाजारपेठेत विना मास्क प्रवेशावर बंदी घालवी, आवाहन बैठकीत करण्यात आले. दरम्यान, दुकानात येताना ग्राहकाकडे मास्क नसल्यास त्याला 100 रुपये व दुकानदाराला 200 रूपये दंड करण्याचे ठरले. 

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबई व इतर मोठ्या शहरातून अनेक गावी येत आहेत. याअनुषंगाने सर्वांनीच खबरदारी घेणेची गरज असल्याने कोवाड बाजारपेठेत येणाऱ्या प्रत्येकाने मास्क वापरावा, मास्क नसलेल्याला बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही, सापडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असेही आवाहन करण्यात आले. कोवाड ही परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने येथे लोकांची मोठी गर्दी होत आहे.

विना मास्कचे लोक उघडपणे फिरत आहेत. दुकानात ये-जा करत आहेत. ठिकठिकाणी गर्दी करत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, व्यापारी संघटना व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कोरोना जनजागृतीची मोहीम हाती घेणार आहे. बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना लस घ्यावी, व्यापाऱ्यांनी मास्क नसलेल्या ग्राहकाला माल देवू नये, विना मास्क ग्राहक दुकानात आल्यास ग्राहकाला 100 रुपये व दुकानदारांवर 200 रूपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे ठरले. 

लस घेण्याचे आवाहन 
व्यापाऱ्यांनी सॅनीटायझरचा वेळोवेळी वापर करावा. सुरक्षित अंतर ठेवून व्यापार करावा, अशाही सुचना करण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस देणे सुरू आहे. 45 वर्षावरील जेष्ठ नागरिक, रूग्ण व व्यापारी वर्गाने लस घ्यावी, असेही आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : पुण्यात दहीहंडी फोडण्यासाठी निघालेल्या गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT