Kolhapur LokSabha Election esakal
कोल्हापूर

लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच, 'या' विद्यमान खासदारांनाच मिळणार तिकीट; शिवतारेंच्या दाव्याने चर्चांना उधाण

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून आम्ही दूर जाऊ लागलो.

सकाळ डिजिटल टीम

'सर्वसामान्य माणूस, पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी नाळ जुळलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.'

कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील दोन्हीही विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) या दोन्हीही जागा शिंदे गटाकडेच असतील आणि दोन्ही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल’, असा दावा माजी मंत्री व शिवसेना संपर्कप्रमुख विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला.

शिवतारे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मंगळवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिवतारे म्हणाले, ‘शिवसेनेत पुर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक अशी यंत्रणा होती. त्यातून सामान्य कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला न्याय मिळत होता. आता ही परिस्थिती बदलली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून आम्ही दूर जाऊ लागलो. परिणामी मुख्यमंत्री शिंदे यांना वेगळा विचार करावा लागला. सर्वसामान्य माणूस, पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी नाळ जुळलेला नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच आता ते मुख्यमंत्रीपदावर असल्यानंतर आपण पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले पाहीजेत.’

ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा व विधानसभेच्या किमान सहा जागा जिंकण्याचे नियोजन करावे लागले. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांतही पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहीजे.’ यावेळी जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रविंद्र माने यांनी शिवतारे यांचे स्वागत केले. उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, रणजित मंडलिक, युवा सेनेचे निशिकांत पाटील, संदीप ढेरे, भाऊसाहेब आवळे, रूपाली चव्हाण, वैशाली डोंगरे, अजित सुतार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT