Indian Bison Herd in Turukwadi Ghat Sakal
कोल्हापूर

तुरुकवाडी घाटात गव्यांचा कळप

तुरुकवाडी येथील घाटात गव्यांच्या कळपाचे दिवसाही दर्शन होत असल्याने प्रवाशी, वाहनचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

तुरुकवाडी येथील घाटात गव्यांच्या कळपाचे दिवसाही दर्शन होत असल्याने प्रवाशी, वाहनचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुरुकवाडी - येथील घाटात गव्यांच्या कळपाचे (Indian Bison Herd) दिवसाही दर्शन होत असल्याने प्रवाशी, वाहनचालकांत भीतीचे वातावरण (Atmosphere of Fear) निर्माण झाले आहे.

तुरुकवाडी, शाहिरवाडी, आगलावेवाडी, कर्नाळेवाडी, कोतोली धनगरवाडा येथे गव्यांचे कळप आहेत. गव्यांचे दिवसाही दर्शन होत आहे. कोतोली, तुरुकवाडी परिसरातील ऊस, मका आदी पिके रातोरात गव्यांकडून फस्त केली जात आहेत. मका पिकाचा फडशा पाडला जात आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना केल्या. मात्र, गव्यांचे कळप दाद देत नाहीत. दिवसा वानर, माकड तर रात्री गवा, डुक्कर, साळींद्र आदी रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढत आहे.

हातातोंडाशी आलेले पीक रात्रीत नष्ट होत असल्याने शेतकरी पुरता हबकला आहे. शाहिरवाडी, सोनारवाडी, माळेवाडी, तुरुकवाडी येथील शेतकऱ्यांनी वारणा उजवा कालव्यावरील क्षेत्रात पिकेच घेणे थांबविले आहे. तुरुकवाडी घाटात तर गव्यांचा कळपच आहे. रस्त्यालगतच गव्यांचा कळप वावरत असल्याने प्रवाशांना रामभरोसे प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

गव्यांपासून शेतीचे नुकसान टळावे या उद्देशाने वनविभागाने तुरुकवाडी घाटालगत चर खोदली मात्र, पावसाने एकाच महिन्यात ती बुजली. त्याऐवजी कमी खर्चात तारेच्या कुंपणापासून पिकांचे संरक्षण झाले असते.

- हंबीरराव पाटील, शेतकरी शाहिरवाडी

कोतोली परिसरातील शासकीय, खासगी वनांना काही लोकांनी वणवे लावल्यामुळे चारा नष्ट झाला आहे. पाणवठे कोरडे पडल्याने वन्यजीव चारा, पाण्याच्या शोधासाठी मानवीवस्तीकडे वळले आहेत.

- सौ. कांबळे वनरक्षक, शाहूवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT