कोल्हापूर : कोरोना तपासणीचा दाखला असल्याशिवाय कर्नाटकात एसटी प्रवाशांना प्रवेश नाही. अशा स्थितीत कर्नाटकातील बस गाड्यांनी मात्र महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत पुण्यापर्यंत बस फेऱ्या चालवल्या. त्यातून एसटीचा अंदाजे 10 लाखांचा महसूल पळवला आहे.
कर्नाटक प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे महाराष्ट्राच्या एसटी प्रवाशांना कर्नाटक प्रवेश बंद तर कर्नाटकच्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश खुला असे परस्पर विरोधी चित्र आहे. त्याचा फटका एसटीच्या महसुलाला बसत आहे. याची शासकीय पातळीवर कोणीच कसलीही दखल घेतलेली नाही.
गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या मोजक्याच जिल्ह्यात, शहरात वाढू लागली. त्यानंतर लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. कर्नाटक प्रशासनाने कोगनोळी नाक्याजवळच तपासणी सुरू केली. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना तपासणीचा दाखला असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश करता येणार नाही असे सांगत एसटी बससह खासगी वाहनेही कर्नाटक सीमेवरून माघारी पाठविली.
मंगळवार दुपारपासून महाराष्ट्र एसटी व कर्नाटक फेऱ्या रद्द केल्या. या घटनेला 12 तास उलटण्यापूर्वी कर्नाटकच्या बस कोल्हापूरसह महाराष्ट्रात प्रवेश करून महाराष्ट्रातील प्रवासी कर्नाटकात नेत आहेत. त्यासोबत महाराष्ट्रात अंर्तगतही अनेक गावात कर्नाटकाच्या बसला गाड्या प्रवासी वाहतुक करत महसूल गोळा करत आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे कसलेच बंधन नाही.
बाहेरच्या बाहेर प्रवासी वाहतूक
आज सकाळी 8 वाजल्यापासून कर्नाटकच्या गाड्या महाराष्ट्र येऊ लागल्या. एसटी अधिकारी संभ्रमीत झाले. कर्नाटकातील बाधीत रूग्ण कोल्हापुरात आले तर त्याचे काय करावे? असाही प्रश्न उपस्थित झाला या कारणास्तव कर्नाटकातील गाड्यांना बसस्थानकात प्रवेश बंद केला तेव्हा कर्नाटकातील बसवाल्यांनी कावळा नाका किंवा हायवेवर प्रवाशांना उतरून शहरात महसूल जमा करण्याचा सपाटा लावला.
""कर्नाटकाच्या बस कोल्हापूरसह अन्य भागात येऊन प्रवासी वाहतूक करत आहेत. मात्र कोरोना संसर्गीत प्रवासी कर्नाटकातून कोल्हापुरात येऊ नयेत, यासाठी कर्नाटक बसेसना आज बसस्थानकात प्रवेश नाकारला आहे.''
-शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.