कोल्हापूर

कोल्हापूर : महापालिका निवडणूक एप्रिल-मे मध्ये?

महापालिका प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

महापालिका प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

कोल्हापूर : गेल्या वर्षापासून सातत्याने लांबणीवर पडलेल्या महापालिका(kolhapur carporation) निवडणुकीला(election) एप्रिलअखेर अथवा मेमध्ये मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने(state election comission) जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. ज्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांची माहिती मागविली गेली. नोव्हेंबर २०२० ला महापालिका सभागृहाची मुदत संपली आहे. यावर्षी कोविडमुळे निवडणूक लांबणीवर पडली. निवडणुकीची पहिली सोडत एक सदस्यीय प्रभाग डोळ्यांसमोर ठेवून काढण्यात आली. नंतर राज्य शासनाने बहुसदस्यीय पद्धत लागू केली.

महापालिका प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. तीन प्रभागांचा एक प्रभाग याप्रमाणे आराखडा तयार करून राज्य शासनाला सादर केला. तो मंजूर झाल्यानंतर निवडणूक आयोग महापालिकेला पत्र देऊन सोडत केव्हा काढायची याचा कार्यक्रम जाहीर करेल. तीन प्रभागांचा एक प्रभाग याप्रमाणे तीस प्रभाग होतील. दोन प्रभाग हे प्रत्येकी दोन सदस्यांसाठी असतात. प्रभागांची संख्या पहिल्यांदाच ८१ वरून ९२ इतकी होत आहे. सध्या राज्यभर ओबीसी आरक्षणाचा विषय गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी राज्य शासनाची भूमिका आहे; मात्र निवडणूक आयोग ही भूमिका कितपत मान्य करतो, या बाबतही प्रश्‍नचिन्ह आहे. तूर्तास तरी एप्रिलअखेर अथवा मेमध्ये निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. दरवेळी निवडणूक अमूक एका महिन्यात होणार याची चर्चा होते. नंतर प्रत्यक्षात निवडणूक पुढे ढकलली जाते.

तर नियोजित कार्यक्रमात बदल

कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका नजीकच्या काळात आहेत. ओमिक्रॉनची स्थिती सध्या तरी आटोक्यात आहे. नव्या वर्षात तिसरी लाट आल्यास निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमात बदलहोऊ शकतो.कार्यक्रमात बदलकोल्हापूरसह राज्यातील प्रमुख महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका नजीकच्या काळात आहेत. ओमिक्रॉनची स्थिती सध्या तरी आटोक्यात आहे. नव्या वर्षात तिसरी लाट आल्यास निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमात बदलहोऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT