Kalamba Jail  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : कळंबा कारागृहात कादंबरीतून मोबाईल

संशयित वाघमोडेवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्पीड पोस्टाच्या पाकिटात कादंबरीत लपवून मोबाईल संच, बॅटऱ्या आणि चार्जर पाठविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुभाष संतोष वाघमोडे (रा. कोल्हापूर) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काल (ता. १) झालेल्या तपासणीदरम्यान गांजासदृश पाला सापडला होता.

पोलिसांनी सांगितले, की कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना येणारी रजिस्ट्रर पोस्ट ईडी, स्पीड पोस्टाने आलेली पत्रे तपासून दिली जातात. काल ही पत्रे तपासण्याचे काम ‘वॉचमन’ म्हणून काम पाहत असलेला शिक्षाधीन बंदी महेश पाटील करीत होता.

त्यावेळी त्याला संशयित सुभाष वाघमोडे याने जामिनावर खुले झालेल्या एका न्यायालयीन बंदीच्या नावे रजिस्ट्रर पोस्टाने एक कादंबरी पाठवली होती. त्यात मोबाईल संच, त्याच्या चार बॅटऱ्या आणि चार्जर लपवून पाठविल्याचे दिसून आले. त्यामुळे तुरुंगाधिकाऱ्यांनी कारागृहाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार संशयित वाघमोडेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 50,000 चे झाले तब्बल 7 लाख! 1320% रिटर्न देणाऱ्या शेअरची जोरदार चर्चा; 3 आठवड्यांत पैसा डबल

Vaibhav Sooryavanshi चा खेळ पाहण्यासाठी अजित आगरकर चेन्नईत पोहोचणार! KL Rahul ची माघार, हा सामना कुठे रंगणार, Live कुठे?

हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर

Marathi News Live Updates: जेडब्ल्यू मॅरियट आणि शेराटन हॉटेलविरुद्ध पुणे पोलिसांची कारवाई

Teachers Day 2026: आयुष्यभराची २५ लाखांची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी खर्चली; शिक्षकाने उभारली वंचितांसाठी शाळा!

SCROLL FOR NEXT