BJP esakal
कोल्हापूर

Kolhapur : नव्या कार्यकारिणीला मार्चअखेरचा मुहूर्त

प्रदेश भाजपकडून चाचपणी सुरू अधिवेशनानंतर होणार घोषणा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या महानगर (शहर) आणि ग्रामीण या दोन्ही जिल्हा कार्यकारिणीत मोठे बदल होणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस राज्याचे अधिवेशन झाल्यावर हे बदल करण्यात येतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून काही जुन्या मंडळींकडे नवी पदे देण्यात येणार आहेत.

भारतीय जनता पक्षात दर तीन वर्षांनी राष्ट्रीयस्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत कार्यकारणी बदलली जाते. या नियमानुसार आता नवी कार्यकारणी घोषित करण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून याची तयारी सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याचे सूतोवाच केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीनंतर हे ‘बदलाचे वारे’ पक्षात वाहू लागले.

सध्या अजित ठाणेकर, सचिन तोडकर, विजय जाधव आणि विजय सूर्यवंशी हे शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. यातील काही जणांनी पक्षातील पदाधिकारी आणि प्रदेशातील वरिष्ठ यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण कार्यकारिणीत माजी आमदार अमल महाडिक, राजवर्धन निंबाळकर आणि नाथाजी पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

मात्र सध्याचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना मुदतवाढ मिळेल, असे वरिष्ठांकडून सांगण्यात येते. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यावर लगेचच राज्य पातळीवर कार्यकारणी बदलाचे काम सुरू होईल. प्रदेश कार्यकारणीतही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांना काय वाटते, जिल्ह्यातील नेत्यांच्या मनात कोणती नावे आहेत. तसेच पक्षाच्या हितचिंतकांना काय वाटते याचा अंदाज घेण्याचे काम प्रदेश पदाधिकारी करत आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस या नियुक्त्या होतील, असे सांगण्यात येत आहे.

नव्या नेत्यांनाही संधी

गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यात प्रभाव असणारे संग्रामसिंह कुपेकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनाही जिल्हा कार्याकराणीत महत्त्वाचे स्थान देण्यात येईल. तसेच स्थानिक पातळीवर जे नेते नव्याने पक्षात आले आहेत त्यांचाही विचार होईल.

‘त्या’ अहवालाचा विचार होणार

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केले होते. त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. नव्या कार्यकारणीची घोषणा करताना या अहवालातील नावांना वगळण्यात येईल, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT