kolhapur municipal corporation call who boy corona report negative 
कोल्हापूर

बापरे हा काय प्रकार? बावीस दिवस उपचार घेऊन बरा झालेल्या तरूणाला 'तो' फोन आला अन् पायाखालची जमीनच सरकली 

सुनील पाटील

कोल्हापूर : हॅलो तुम्ही कोठे राहता, तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असा महानगरपालिकेकडून आलेल्या फोन ऐकून संभाजीनगर येथील तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. आकाश नावाच्या तरुणाने 22 दिवसापूर्वी स्वॅब दिला होता. यामध्ये तो तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला होता. आज पुन्हा 22 दिवसानंतर पुन्हा तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला आणि महानगरपालिकेच्या नियोजनातील गलथान कारभार उजेडात आला. असे शहरातील अनेकांना फोन गेल्यामुळे या लोकांची भंबेरी उडाली आहे. 

संभाजीनगर येथील आकाश नावाच्या तरुणाने 22 जुलै 2020 ला शेंडा पार्क येथे कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला होता. त्यानंतर 25 जुलैला त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांला दवाखान्यात ठेवण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु झाले. याचवेळी त्याच्या घरातील सर्वांचे स्वॅब घेण्यात आले. 27 जुैलला त्याच्या घरच्यांचा रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या 22 दिवसात त्या तरुणावर आणि त्याच्या कुटूंबियांवर उपचार झाले. कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्टही आला. पण आज दुपारी पुन्हा महानगरपालिकेकडून त्या तरूणाला तुम्ही कोठे राहता, तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तुम्हाला दवाखान्यात दाखल व्हावे लागले. असा फोन आला आणि त्या तरुणाच्या पायाखालची जमिन सरकली. एक तर 22 दिवस दवाखान्यात आणि त्यानंतर घरात बसून औषधोपचार घेतले.

ठणठणीत बरेही झालो आणि आता पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट कसा येईल. असा संतापजनक सवाल त्या तरुणाने महापालिकेकडून फोन करणाऱ्याला केला. यावेळी आम्हाला वरून नावे आली आहेत, त्या सर्वांना आम्ही फोन करत असल्याचे सांगितले. वास्तविक आकाश व त्याच्या कुटूंबियांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट 22 दिवसापूर्वीच आला होता. ते सर्वजण आता ठणठणीत बरे झाले आहेत. पण आकाशला आज पुन्हा फोन करून तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. पण आकाश त्या फोन करणाऱ्यांना सर्व माहिती सांगितल्यानंतर आम्ही माहिती घेतो. असे म्हणून फोन बंद केला.

पण, आकाशच्या मनातील भिती मात्र जाता जात नव्हती. कारण, एकदा फोन आला की याचा त्रास त्याला व त्याच्या सर्व कुटूबियांना होणार या भितीने त्यांने संबंधीत महापालिका यंत्रेणेकडे धाव घेवून सर्व माहिती देवून ससेमिरा थांबवला. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT