Kolhapur Rain Update Panchganga River Water Level  esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain : महापुराचा धोका टळला! पंचगंगेची पाणीपातळी झपाट्यानं कमी; कोल्हापुरातील 14 धरणांत किती आहे साठा?

दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वच नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र वगळता काल दिवसभर तुरळक सरींव्यतिरिक्त दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.

राधानगरी धरणाचे (Radhanagari Dam) स्वयंचलित दोन दरवाजे उघडे असतानाही रात्री आठनंतर पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांपर्यंत खाली आली आहे. धरणातून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर २४ बंधारे पाण्याखाली आहेत.

दूधगंगा प्रकल्पातील पाणीपातळी समाधानकारक वाढत आहे. सध्या २५.४० टीएमसीपैकी १८.४७ टीएमसी (७२.७४ टक्के) धरण भरले असून १९.६८ टीएमसी भरल्यानंतर दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून (Kalammawadi Dam) पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सर्वच नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. दरम्यान, काळम्मावाडी धरणाच्या गळतीमुळे धरणात गेल्यावर्षी जेवढा पाणीसाठा केला होता, तेवढाच पाणीसाठा केला जाणार आहे. धरणाची गळती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हे धरण ७२.७४ टक्के भरले आहे. धरणात १९ टीएमसीपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग सुरू केला जाणार आहे.

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी ८.३६ ८.२४

  • तुळशी ३.४७ २.३६

  • वारणा ३४.३९ २९.२८

  • दूधगंगा २५.३९ १८.४७

  • कासारी २.७७ २.४३

  • कडवी २.५१ २.५२

  • कुंभी २.७१ २.३४

  • पाटगाव ३.७१ ३.१५

  • चिकोत्रा १.५२ १.१४

  • चित्री १.८८ १.६९

  • जंगमहट्टी १.२२ १.१६

  • घटप्रभा १.५६ १.५६

  • जांबरे ०.८१ ०.८२

  • आंबेओहोळ १.२४ १.२०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT