Internet service started in Kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur Riots : दंगलीनंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर; Internet Service पुन्हा सुरु

कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीनंतर (Kolhapur Riots) आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीनंतर (Kolhapur Riots) आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळं बंद करण्यात आलेली कोल्हापुरातील इंटरनेट सेवा (Internet Service) आता पूर्ववत झाली आहे.

आज सकाळी १० वाजता कोल्हापुरात इंटरनेट सुरु झाले. विविध टेलिकॉम कंपन्यांनी सकाळी १० वाजल्यापासून इंटरनेट सेवा सुरु करण्यास सुरुवात केली. कोल्हापुरातील तणावानंतर सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले होते.

त्यानंतर कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचा स्टेटस (Aurangzeb Photo Status) मोबाईलवर ठेवल्याच्या घटनेनंतर बुधवारी कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीनंतर दुसर्‍या दिवशी गुरुवारी कोल्हापूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत.

कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. इंटरनेट कधी सुरु होणार? याची लोक वाट पाहात होते. गुरुवारी रात्री इंटरनेट सुरु होईल यासाठी काही लोक रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहिले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : चिपळूण उड्डाणपुलाची आज पाहणी; नागरिकांच्या तक्रारीची दखल, कामाच्या दर्जाबाबत शंका

Land Records: जमीन मालकांसाठी मोठी बातमी! ‘क’ प्रतीवर अक्षांश-रेखांश असल्यास पुन्हा मोजणीची गरज नाही, भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT