Kolhapur  sakal
कोल्हापूर

Kolhapur : ‘अतिक्रमण हटाओ’ला हिंसक वळण;विशाळगड परिसरात तणाव,गजापुरात घरांची जाळपोळ

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईला हिंसक वळण लागले.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईला हिंसक वळण लागले. प्रत्यक्ष गडावर पोलिसांनी कोणालाही सोडले नाही, पण त्याचवेळी संतप्त जमावाने गडाला लागून असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिली. गाड्यांवर तुफान दगडफेक करून काही चारचाकी गाड्या उलथून टाकल्या.

एका घराला लावलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला, त्याच घरात अन्य चार भरलेली सिलिंडरही होते, पण वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकारात काही ठिकाणी तलवारी, कोयते, कुदळ यांचाही वापर करण्यात आला. या प्रकाराने विशाळगडासह गजापुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेनंतर या परिसरातील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला. या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आज सकाळी पोलिसांना चकवा देऊन प्रत्यक्ष गडावर आलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी असलेल्या मुख्य धार्मिक स्थळावर दगडफेक केली. या संतप्त जमावाला पोलिसांनी खाली पाठवले. दुपारी साडेबाराच्या सुमारास संभाजीराजे गडावर पोहोचले. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही होते. पोलिसांनी त्यांना गडाच्या पायऱ्याजवळ अडवले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्री जोपर्यंत अतिक्रमणे तत्काळ काढण्याचे आदेश देत नाहीत तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला. ज्या अतिक्रमणांचे वाद न्यायालयात आहेत ती सोडून उर्वरित अतिक्रमणे काढण्याचे काम सोमवार (ता.१५) पासून सुरू करतो, असे आश्वासन शिंदे यांनी संभाजीराजांना दिले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कार्यकर्त्यांना गड सोडण्याची विनंती केली. संभाजीराजे व पोलिस, प्रशासनात चर्चा सुरू असताना विशाळगडाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिस वर सोडत नसल्याने संतप्त झालेल्या या कार्यकर्त्यांनी पायथ्याला लागून असलेल्या गजापुराकडे आपला मोर्चा वळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Ankita Bhandari Killed : अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी माजी आमदार आणि अभिनेत्री नार्को टेस्टसाठी तयार, कथित VIP viral video चे गूढ उकलणार

स्मशानभूमीजवळ PM मोदींचा फोटो, भोवती सुई टोचलेलं लिंबू, नारळ अन् कुंकू; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT