कोल्हापूर

कोरोची: नागपंचमीनिमित्त अंनिसकडून प्रबोधन कार्यक्रम संपन्न

विनायक होगाडे

कोरोची : कोरोची येथील म्हसोबा मंदिर परिसरात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, म्हसोबा मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी नागपंचमीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नागपंचमीनिमित्त परिसरातील सर्पमित्रांचा पुस्तके देवून सत्कार करण्यात आला.स्वागत अंनिस इचलकरंजीचे कार्याध्यक्ष प्रविण आंबले यांनी केले. अंनिसचे राज्य सांस्कृतिक प्रमुख सुनिल स्वामी प्रास्ताविकात म्हणाले ," नागपंचमीला चिकित्सेचा आयाम जसा द्यायला हवा तसा त्याला शास्त्रीय आधारही द्यायला हवा!सर्पमित्र राहूल खापरखंडे, अभिजीत सुतार, सुरज सनदी, सचिन इंगवले, निलेश साळुंखे, प्रेम भोई, राहूल मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्पमित्र अवधूत माने यांनी म्हटलं की, विषारी सापांची माहिती घ्या कारण आपण विनाकारण सरकसकट न्यायाने बिनविषारी सापाला देखील मारतो, हे बरोबर नाही. तर सर्पमित्र अभिजीत सुतार यांनी म्हटलं की, सापांना घाबरू नका, निसर्गात सापांचे महत्व आहे ते जाणून घ्यावे ,जगा आणि जगू द्या हा नियम त्यांनाही लागू आहे! सत्कार आणि मनोगतानंतर सर्पांची शास्त्रीय माहिती सांगणारा होलिस्टिक एनवायर्नमेंटल यांनी बनवलेला 'भारतीय साप' माहितीपट दाखवण्यात आले. यासाठी अमोल पाटील आणि दामोदर कोळी यांनी प्रयत्न केले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे संघटक प्रफुल्ल आवळे, प्रा पडवळे सर, साद चाँदकोटी, रुचिता पाटील, श्रेयस बदडे, प्रणिता पाटील, दिपाली कांबळे, अक्षय कांबळे, स्नेहल माळी, शरद वास्कर ,रघुनंदन फणसळकर ,अविनाश पोवार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सौरभ पोवार यांनी केले तर आभार आदित्य धनवडे यांनी मानले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

साप्ताहिक राशिभविष्य : (१२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६)

SCROLL FOR NEXT