कोल्हापूर

गिरोलीत बांधावरच केला कृषी दिन साजरा; युवा शेतकऱ्याचे कौतुक

निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : वेळ सकाळी अकरा वाजताची.गाव गिरोली ता. पन्हाळा. या गावातील मोहन कदम या युवा शेतकऱ्याच्या बांधावर काल कृषी विभागाचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित झाले. आणि चक्क शेताच्या बांधावर बसून कृषी दिनाचा आगळा वेगळा कार्यक्रम दिमाखदार पध्दतीने साजरा झाला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पन्हाळा पंचायत समिती आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गिरोली गावातील शिवारात कृषी दिन करण्याचे काल नियोजन झाले .त्यानुसार युवा शेतकरी मोहन कदम यांनी आपल्या शेतात दख्खन फार्म या ठिकाणी बांधावर कार्यक्रमाचे उत्कृठ असे नियोजन केले. कदम यांनी अगदी फोंड्या माळावर फळबाग लागवड गांडूळ खत, मधमाशा प्रकल्प उभा केला आहे.(krushi-day-celebration-in-girgaon-panhala-kolhapur-marathi-news)

पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना हा प्रकल्प माळरानातील शेती फळ लागवड पाहता यावी त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच निमंत्रीत करण्यात आले होते.प्रारंभी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्यानंतर शेतकर्‍यांना कृषी दिनाचे महत्त्व ,कृषी योजना ,शासकीय योजनांची माहिती देऊन आधुनिकतेने शेतकऱ्यांना शेती करण्याचे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले.या वेळी वसंतराव नाईक कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी दिलीप चौगुले .महादेव पाटील जाफळे डॉ.प्रदीप सूर्यवंशी वारणा नगर यांचा कृषी विभागाच्या वतीने गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील, पन्हाळा कृषी अधिकारी रामचंद्र धायगुडे विकास अधिकारी आर बी सावंत माजी सभापती अनिल कांदुरकर पृथ्वीराज सरनोबत, रणजित शिंदे सरपंच मधुकर कांबळे पोलीस पाटील मोहन कदम, कृषी अधिकारी गौरी मठपती अविनाश मेश्राम कृषी सहाय्यक भालचंद्र कोतेकर ग्रामस्थ तसेच शेतकरी उपस्थित होते.

गौरी मठपती यांनी कृषी दिना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अविनाश मेश्राम यांनी स्वागत केले श्री धायगुडे यांनी आभार मानले.गिरोली गाव हे उंच डोंगर पठार वसले आहे .परिणामी, उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. त्यामुळे मोहन कदम यांनी आपली फळबाग लागवड जिवंत ठेवण्यासाठी टँकरने पाणी आणून सर्व झाडे जतन केली आहेत . फोंड्या माळा वर ही झाडे आनंदाने डोलत आहेत. सर्व परिसर हिरवागार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT