The look is changing, the designer mask .... 
कोल्हापूर

लूक बदलतोय, डिझायनर मास्क .... 

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : कोरोनामुळे माणसाचा सोबती बनलेल्या मास्कने बाजारपेठेला नवी झळाळी आणली आहे. मास्कच्या नव्या व्हरायटी उपलब्ध होत असताना हुबेहुब मानवी चेहऱ्याला मिळते जुळते असणाऱ्या मास्कने सर्वांनाच भुरळ घातली आहे. फॅशनेबल मास्कबरोबर फेस मास्कलाही मागणी वाढत आहे. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर्स यांना महत्व वाढले. दैनंदिन कामे, विविध ठिकाणचा वावर मास्क विना करणे मुश्‍किल झाले आहे. सुरवातीला साध्या मास्कची चलती होती पण ग्राहकांची आवड व बदलता ट्रेंड लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण मास्क बाजारात उपलब्ध आहेत. साध्या हात रूमालापासूनचे अनेक कल्पकतापूर्वक मास्कचे दर्शन बाजारपेठेत दिसत आहे. विविध कापडापासून उत्तम दर्जाचे मास्क बाजारात आहेत. 

अनेक बड्या कंपन्यांनी नाविन्यपूर्ण डिझायनर मास्क बाजारात आणले आहेत. कापड उद्योगात गुंतवणूक करणारे अनेक कंपन्या आता मास्क उत्पादनात पुढे आल्या आहेत. शहरातील कापड दुकानातही मास्क विक्रीस ठेवताना दिसत आहेत. शहरातील प्रमुख मार्गावर स्टॉल अथवा गल्लोगल्ली मास्क विक्री करणाऱ्या फिरस्त्यांची संख्याही वाढली आहे. लहान मुले, तरूणाई यांच्या आवडीनुसार मास्कचे उत्पादन कंपन्या करत आहेत. या कंपन्यांनी मानवी जीवनशैलीचा बदलता ट्रेंड जाणून घेतल्याने बाजारात विविधरंगी व आकर्षक मास्कला ग्राहकातून मागणी वाढली आहे. 

रोजीरोटीला मास्क विक्रीने तारले 
लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावल्याने अनेकांनी मास्क विक्रीत बस्तान बसवले. नाविन्याचा शोध घेत आकर्षक मास्क बाजारात आणले. मास्क गरज बनल्याने खरेदीलाही ग्राहकांचा उत्साह आहे. आठवडी बाजारातील व फिरस्ते विक्रेत्यांचा दुरावलेला रोजगार मास्क विक्रीने शाबूत राहिला. अगदी 5 रूपयापासून 500 रूपयापर्यंत हे मास्क विक्रीस आहेत. 

मास्कचा वापर गरज बनल्याने मागणीनुसार नाविन्यपूर्ण मास्क बाजारात उपलब्ध आहेत. इचलकरंजी शहरासह अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणात मास्क तयार होत आहेत. येत्या काळात मानवाला अनुरूप असे मास्क बाजारात येतील. 
- चंद्रकांत गजगेश्‍वर, विक्रेते 


दृष्टिक्षेप 
- मानवी चेहऱ्याला मिळते जुळते लूक 
- फेस मास्कलाही वाढती मागणी 
- कापडापासून उत्तम दर्जाच्या मास्कची चलती 
- 500 रूपयांपर्यंत किंमती 
कोल्हापूर

कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT