Maharashtra Kesari wrestling competition without spectators due to corona 
कोल्हापूर

महाराष्ट्र केसरीचा शड्डू घुमणार प्रेक्षकांविना ; शासनाच्या परवानगीकडे मल्लांच्या नजरा

मतीन शेख

कोल्हापूर : कोरोना महामारीत महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू थांबला; परंतु मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्ताने शड्डू पुन्हा घुमायला लागेल, अशी आशा आहे. ही स्पर्धा नेमकी कधी व कशी होणार याकडे पैलवान मंडळी व शौकींच्या नजरा आहेत. कोरोनामुळे आयपीएलच्या धर्तीवर प्रेक्षक विरहीत स्पर्धा घेण्याचा विचार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद करत आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा होतील, असे संकेत परिषदेने दिले आहेत.

कोरोनामुळे सर्वच राष्ट्रीय व राज्य स्पर्धा बंद आहेत. विविध क्रीडा संघटना परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाची परवानगी राज्य शासन व भारतीय कुस्ती महासंघाकडे मागितली आहे; परंतु त्याला अद्याप हिरवा कंदील मिळाला नाही. शासनाची परवानगी मिळताच स्पर्धा आयोजनासाठी परिषद सज्ज आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी राज्य भरातून शौकिन येतात; परंतु यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेता समूहाने एकत्र येणे शक्‍य नाही. तरी मोजक्‍या यंत्रणेसह पुण्यातील बालेवाडीच्या बंदिस्त क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन करण्याचे विचार परिषदेचा आहे.

असे असेल नियोजन...

स्पर्धेसाठी जवळपास 1000 कुस्तीपटू, 45 प्रशिक्षक, 45 संघ व्यवस्थापक, 50 पंच दाखल होत असतात. शासन नियमानुसार जवळपास 1200 लोकांच्या समूहाने देखील स्पर्धा घेण्यास मर्यादा येत असल्याने छोटे गट करून सामने खेळवण्याचा आराखडा आखला गेला आहे. दरवर्षी चार आखाड्यांवर होणारी स्पर्धा यंदा दोनच आखाड्यावर खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा कालावधी 10 दिवसांचा असेल. मोजके निमंत्रित पाहूणे आणि पत्रकारांना फक्त स्पर्धेला उपस्थित राहता येईल.

थेट प्रक्षेपण होणार...

पहिल्यांदाच स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहे; परंतु सर्व स्पर्धेचे थेट प्रक्षेपण फेसबुक पेज, युट्यूब, इन्स्ट्राग्रामद्वारे दाखवले जाणार आहे. सर्व स्पर्धेचे पुर्नप्रसारणही केले जाणार आहे. यासाठी परिषदेची वेबसाईट कार्यन्वित केली गेली आहे. स्पर्धकांच्या प्रवेशिकाही ऑनलाईन पद्धतीने स्विकारल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनासाठी परिषद सकारात्मक आहे. प्रेक्षक विरहीत स्पर्धा घेण्याचा विचार आहे. परवानगी मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. शासन नियमानुसार स्पर्धेचे आयोजन करू.
- बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस; कुस्तीगीर परिषद

स्पर्धा बंद असल्याने अनेक मल्ल सध्या कुस्तीच्या वर्तुळातून बाहेर पडत आहेत. महाराष्ट्र केसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा लवकर झाली तर मल्लांमध्ये नवे चैतन्य निर्माण होईल. ते परत जोमाने कुस्ती करू लागतील.
- अस्लम काझी, कुस्ती सम्राट  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT