Married woman death in kolhapur 
कोल्हापूर

छळामुळे पेटवून घेतलेल्या विवाहितेच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

गारगोटी : बेगवडे (ता. भुदरगड) येथील सौ. अश्विनी अरविंद गुरव (वय २७) हिने मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतले होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती अरविंद मारुती गुरव व सासू लक्ष्मी मारुती गुरव (रा. बेगवडे) यांच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

याबाबतची फिर्याद जयश्री किशोर गुरव (रा. सांगली) यांनी दिली. पोलिसांनी सांगितले, की बेगवडे येथे अश्विनी गुरव हिचा पती अरविंद गुरव व सासू लक्ष्मी गुरव हे दोघे तिला घरातील काम लगेच करीत नाही, वेळ लावते, तसेच पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होते. त्यांच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून अश्विनीने २२ नोव्हेंबरला पहाटे स्वतःहून अंगावर रॉकेल ओतून घेऊन घराजवळील शौचालयात पेटवून घेतले. यानंतर तिला ‘सीपीआर’मध्ये उपचारांसाठी दाखल केले होते. २३ नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती व सासूविरोधात तक्रार दाखल झाली आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ तपास करीत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT