The Number Of Corona Patients In The Four Wards Of Gadhinglaj Is Zero Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजच्या चार प्रभागात कोरोना रुग्णांची संख्या शुन्य

अजित माद्याळे

गडहिंग्लज : ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोना रूग्णांचा पाचशेचा आकडा पार केलेल्या गडहिंग्लज शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत चार प्रभाग कोरोनामुक्त झाले असून पाच प्रभागामध्ये केवळ सहा रूग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे हे प्रभागही लवकरच कोरोनामुक्त होणार आहेत. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असूनही प्रशासनाचे प्रबोधन आणि नागरिकांकडून घेतली जाणारी काळजी या पार्श्‍वभूमीवर नव्या कोरोना रूग्णांची घटती संख्या दिलासादायक आहे. 

गणेशोत्सवानंतर कोरोना रूग्णसंख्येने उच्चांक नोंदविले. ही महामारी लवकर कमी होते की नाही, अशीच चिंता सप्टेंबरच्या संख्येवरून सर्वांना होती. परंतु, ऑक्‍टोबर महिना सुरू झाला आणि नागरिकांना रोज दिलासा मिळू लागला. सध्या तर रोज एक किंवा दोन तर कधीकधी रूग्णसंख्येने खातेही खोलले नसल्याचे दिसत आहे. या दिलाशामुळे नागरिक आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. 

दरम्यान, शासनाने माझे कुटूंब, माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत घर टू घर जावून नागरिकांची तपासणी सुरू केली. किरकोळ लक्षणे असणाऱ्यांवर वेळीच उपचार सुरू झाले. 50 वर्षावरील नागरिक आणि इतर व्याधीग्रस्तांवर वेळेत औषधोपचार सुरू आहेत की नाही, याचा पाठपुरावा या निमित्ताने झाला. याशिवाय प्रशासनाकडून झालेले प्रबोधन आणि वाढत्या कोरोनाने जागृत झालेल्या नागरिकांमुळेही कोरोनाचा आलेख खालावत असल्याचे चित्र आहे. 

दिवाळीत खबरदारी गरजेचीच... 
पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे. त्या निमित्ताने गडहिंग्लज बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यातच थंडीचे दिवसही सुरू होणार आहेत. या दोन्ही गोष्टी कोरोना वाढीला संधी देणारे आहेत. यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांनीही सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. हा कालावधी खबरदारीने पार पडल्यास कोरोना वाढीला संधी मिळणार नाही. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गडहिंग्लजचा कोरोना आलेख 
- एकूण रूग्ण : 512 
- कोरोनामुक्त रूग्ण : 479 
- मृत्यू 27 

दृष्टीक्षेपात 
- ऍक्‍टीव्ह रूग्ण : 6 
- कोरोनामुक्त प्रभाग : 3, 5, 7, 9 
- प्रभागनिहाय ऍक्‍टीव्ह रूग्ण : प्रभाग 1, 2, 6 व 8 मध्ये प्रत्येकी एक, प्रभाग 4 मध्ये 2 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT