one thousand beds independent hospital will be in kolhapur maharashtra 
कोल्हापूर

कोल्हापुरात होणार एक हजार खाटांचे स्वतंत्र रुग्णालय 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात कोरोनाबाधित रुग्णांसाठी एक हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी चार वसतिगृहे प्रशासनाने ताब्यात घेतली असून, तेथे रुग्णालयातील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तर गैरसोय होऊ नये, यासाठी ही तात्पुरती व्यवस्था आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सीपीआरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लगतच्या भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर सीपीआर अपुरे पडण्याची शक्‍यता आहे. अशा काळात दुसरी सक्षम व्यवस्था असावी, यासाठी प्रशासनाने विद्यापीठाच्या चार वसतिगृहांमध्ये कोरोना रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली आहे. यासाठी प्रशासनाने विद्यापीठाला पत्र दिले होते. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यापीठाने चार वसतिगृहे प्रशासनाच्या ताब्यात दिली आहेत. यातील तंत्रशिक्षण विभागातील एक वसतिगृह प्रशासनाने गेल्या आठवड्यात ताब्यात घेतले. तेथील सर्व साहित्य स्टोअररूममध्ये ठेवून येथे रुग्णालयासाठी आवश्‍यक असणारे साहित्य आणण्यात आले आहे. आज प्रशासनाने मुख्य इमारतीच्या आवारातील मुलांची तीन वसतिगृहे ताब्यात घेतली. येथील साहित्यही हालवण्यात आले. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालयासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 
विद्यार्थी गावी गेल्याने विद्यापीठातील वसतिगृहे रिकामी आहेत. शहरापासून लांब असल्याने येथे संसर्ग होण्याचाही धोका कमी आहे. मुबलक वीज, पाणी असून भोजन बनवण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्थाही आहे. 


चार वसतिगृहात मिळून एक हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येईल. आवश्‍यकता पडल्यास आसपासच्या जिल्ह्यातूनही रुग्ण येथे आणता येतील. या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाची निवड करण्यात आली. हे रुग्णालय तात्पुरते असून, संख्या वाढली तरच याचा उपयोग करण्यात येईल. 
-डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : 3 लाखांची सुपारी अन् अपघाताचा बनाव! विम्याचे 30 लाख मिळवण्यासाठी भावोजीचा गेम करणाऱ्या मेहुण्याला पुराव्यासह बेड्या

World Brain Tumor Day 2026: ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? सौम्य आणि घातक गाठींमधील महत्त्वाचा फरक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बिहारमधील कोचिंग सेंटरमधील गोळीबार प्रकरणात जामीन अर्जावर आज सुनावणी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

SCROLL FOR NEXT