one women worker corona positive in Kolhapur ST Corporation 
कोल्हापूर

Briking -कोल्हापूर एसटी महामंडळ हादरले ; सलग दुसऱ्या दिवशी दुसरा पाॅझिटिव्ह  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - एसटी महामंडळाच्या कोल्हापुरातील विभागीय कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे एसटीचे विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशात विभागीय कार्यालयातील काही कर्मचराऱ्यांची आरोग्य तपासणी झाली आहे तर अनेकांची अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील कामकाजाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.  
 
याबाबत मिळालेली माहिती अशी, गेल्या तीन दिवसापूर्वी विभागीय कार्यालयातील वाहतूक विभागात काम करणारा लिपिक कोरोना पॉझिटिव आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर वाहतूक विभागातील अन्य कर्मचाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या विभागातील जवळपास 16 व्यक्तींची तपासणी झाली. त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

त्यानंतर गुरूवारी मध्यरात्री आवक-जावक विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोन्ही विभाग असे आहेत की येथे एसटी चालक -वाहक आणि कामगारांबरोबर अन्य कर्मचाऱ्यांचीही सतत येथे वर्दळ असते.

गेल्या आठ दिवसात या विभागात कोण कोण येऊन गेले, तसेच यात जास्त वेळ या विभागात थांबलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्या सर्वांची तपासणी होणे आवश्यक आहे. शिवाय जांना काही लक्षणे दिसतात त्यांचे स्वॅब तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र त्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विभागीय कार्यालयातील अन्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी ऑफिसमध्ये जायचे की नाही याविषयी संभ्रमित होते. आज विभागीय कार्यालयाचे फाटक बंद केले. मात्र ज्यांचा आवक-जावक विभाग किंवा वाहतूक विभागाची काहीच संबंध नाही अशा कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी कुठे बसावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यांतर्गत बस सेवेसाठी जे चालक वाहक-ड्युटीवर आहेत ते कमालीचे घाबरून गेले आहेत. बहुतेक जण तर रजा टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. अशा स्थितीत एसटी महामंडळातील दुसरा कोरोना पॉझिटिव विभागीय कार्यालयासाठी चिंता वाढविणारा ठरला आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT