Panhala fort iron cannon Siddi Johar Battle of Pavan Khind 
कोल्हापूर

सिद्दी जोहरचा वेढा, पन्हाळ्यावर लोखंडी तोफगोळा

स्वच्छता मोहिमेवेळी सापडला; वजन तब्बल दोन किलो ७६६ ग्रॅम

सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा : पन्हाळगडावरील कोकण दरवाजा तथा तीन दरवाजा आणि अंधारबाव परिसरातील तटबंदीची स्वच्छता करताना अर्धवट फुटलेला लोखंडी तोफगोळा आढळला. तोफगोळा अर्धा फुटलेला असून, त्याचे वजन दोन किलो ७६६ ग्रॅम आहे. पन्हाळगडाची स्वच्छता करण्यासाठी दर शनिवारी, रविवारी आणि सुटी दिवशी मंडळे, इतिहासप्रेमी तरुण येतात आणि तटबंदीवरील झुडपे, जाळ्या काढतात. पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, पत्रावळी, तसेच इतर कचरा आपापल्या परीने गोळा करून तो नगरपरिषदेकडे सुपूर्द करतात.

दरम्यान आज टोप कासारवाडी येथील दुर्गसेवा प्रतिष्ठान मंडळाचे तरुण पन्हाळगडी आले होते. तीन दरवाजा ते अंधारबाव परिसरातील तटबंदीची स्वच्छता करताना तटबंदीत घुसलेला तोफगोळा आढळला. अर्धवट फुटलेल्या तोफगोळ्यासह या गोळ्यांमुळे फुटलेला तटबंदीचा दगडही आढळला. हा तोफगोळा प्रतिष्ठानचे रोहन चेहरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुरातत्व खात्याचे कर्मचारी अशपाक गारदी यांच्याकडे सुपूर्द केला.

दुर्गसेवा प्रतिष्ठान, कासारवाडीचे सौरभ मुळीक, संग्राम लुगडे, सौरभ पोवार, प्रथमेश लुगडे, प्रतीक शिंदे, ओंकार जाधव, दीपक मुळीक, प्रताप वरिंगे, ऋषीकेश कुशिरे, गौरव शिंदे, सागर कोळेकर, विकी भोसले, बारक्या सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यापूर्वी पावन गडावर दगडी तोफगोळ्यांचा साठा सापडला आहे. बऱ्याच तोफा सापडल्या आहेत; पण लोखंडी तोफगोळा आढळला नव्हता. तीन दरवाजाच्या तटबंदीत आज अर्धा गोळा सापडल्याने इतिहास प्रेमीत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

सिद्दी जोहरचा वेढा

सिद्दी जोहरने शिवाजी महाराजांना घेरण्यासाठी पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्या वेळी तीन दरवाजावर केलेल्या तोफांच्या माऱ्यातील गोळा असावा, असा तर्क जाणकारांतून व्यक्त होत आहे. दरवाजाच्या कमानीवर तोफेच्या गोळ्यांमुळे फुटलेला दगड आजही जसाच्या तसा आहे. दुसरी शक्यता १८४४ मध्ये इंग्रजांनी बंडाच्या वेळी तोफांच्या सहाय्याने चार दरवाजा पाडून गडावर येण्यासाठी रस्ता केला, त्यावेळीही तीन दरवाजावर मारा केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : ब्रेकिंग न्यूज! नविद मुश्रीफ पराभूत; सतेज पाटलांची आघाडी १४ जागांवर आघाडी

Latest Marathi News Live Update : नावेद मुश्रीफ यांचा धक्कादायक पराभव; सतेज पाटलांचे निकटवर्तीय शशिकांत खोत विजयी

Namo Shetkari Yojana Latest Update : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? 5 हजारांची दुष्काळी मदत घोषित, पण नमो शेतकरी योजनेच्या 4 हजारांचे काय?

Gokul Election Latest News : गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफांना धक्का? सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

टायगर श्रॉफवर अल्पवयीनाकडून गोळीबार, दुसरा हल्लेखोर रॅपिडो ड्रायव्हर कम सुपारी किलर; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT