Priyanka Chavan re arrested by Bhudargad police in the third case 
कोल्हापूर

सीआयडी विभागात नोकरी लावते म्हणुन मामाच्या साथीने अनेकांना बनवले तिने मामा

सकाळवृत्तसेवा

गारगोटी - येथील तोतया सीआयडी पोलिस उपनिरीक्षक प्रियांका प्रकाश चव्हाण, तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण यांना भुदरगड पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली.
सीआयडी विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिस उपनिरीक्षक प्रियांका चव्हाण व तिचा मामा विठ्ठल निलवर्ण यांच्यावर यापूर्वी फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तिच्याकडून गणवेशातील फोटो, सीआयडी विभागाचे बनावट ओळखपत्र, नेमप्लेट, फायबर काठी, बूट तसेच अभिनंदन पत्रे जप्त केली आहेत.

प्रियांका व तिच्या मामाची आज दुसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपली होती. पोलिसांनी न्यायालयाच्या बाहेर दोघांना तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली. याप्रकरणी निळपण येथील मंगेश आनंदा चौगले याला सीआयडी विभागात कसबा बावडा येथे शिपाईपदावर नोकरी लावतो असे सांगून पाच लाखांची मागणी केली होती. यापैकी २ लाख ७५ हजार रुपये मंगेशकडून घेतले असून त्याला बनावट ओळखपत्र व नेमणूकपत्र दिले होते. फसवणूक झाल्याची फिर्याद मंगेश चौगले याने पोलिसांत दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चव्हाण व निलवर्ण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

माहिती देण्यास टाळाटाळ

प्रभारी पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड व उपनिरीक्षक दिनेश काशीद यांनी या गुन्ह्याची माहिती प्रसारमाध्यम प्रतिनिधींना देण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे सांगून अनेकदा वेळ मारून नेण्याचा प्रकार केला. यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिस पोहचणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संपादन - मतीन शेख

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT