Ajit Pawar Maratha Community esakal
कोल्हापूर

'Ph.D करून काय दिवे लावणार?' अजितदादांच्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक; हकालपट्टीची केली मागणी

मराठा विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘पीएच.डी. करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते.

सकाळ डिजिटल टीम

गेले पन्नास दिवस सकल मराठा समाजाच्या वतीने (Maratha Community) आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.

कोल्हापूर : नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये (Nagpur Winter Session) सारथी संस्थेतून पीएच.डी. करणाऱ्या (Ph.D. Degree) मराठा विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘पीएच.डी. करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. यामुळे सुशिक्षित मराठा पिढीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप करत  सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी विडंबनात्मक फलक उभा करून अभिनव निषेध करण्यात आला.

दसरा चौकात कार्यकर्त्यांनी ‘अजित पवारांची हकालपट्टी करा’, ‘मराठा आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणांनी परिसर दुमदूमून टाकला. गेले पन्नास दिवस सकल मराठा समाजाच्या वतीने (Maratha Community) आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला विविध संस्थांचा पाठिंबा मिळत आहे.

अधिवेशनात पीएच.डी. विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना वसंतराव मुळीक यांनी, सारथी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी असे उद्‌गार निषेधार्ह असल्याचे सांगितले. विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करूनच फेलोशिप घेत असतात. मात्र या विधानाने अशा विद्यार्थ्यांच्या आपल्या मागण्या प्रशासनाकडून पूर्ण होईल या अपेक्षाच लोप पावल्या आहेत. पण सकल मराठा समाज या विद्यार्थ्यांच्या मागे सक्षमपणे उभा आहे, असे सांगितले. 

ॲड. बाबा इंदुलकर यांनी, ‘मोठ्या कष्टाने मनोज जरांगे -पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उभे केलेले आंदोलन विविध बाजूंनी घेरण्याचा व मोडीत काढण्याचा शासनाचा डाव असल्याची टीका केली. या वेळी ‘सारथी’तून पीएच.डी. करणारे संभाजी खोत, ऋषीराज भोसले, मयूर भारमल, सौरभ पोवार, स्वप्नील पवार उपस्थित होते. 

दरम्यान, माजी नगरसेवक नियाज खान यांच्या नेतृत्वाखाली उत्तम वरुटे, विष्णू लाखे, राम डावाळे, किसन लाखे, जयवंत पाटील, सुधीर घोरपडे, संतोष सोनटक्के, मोहित डावाळे, सागर डावाळे, गौतम इवाळे, सनी पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT