Rasta Rocco Movement In Channeti Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वतनाच्या जमिनींसाठी चन्नेटीत रास्ता रोको 

अशोक पाटील

कोवाड : राजगोळी भागातील चन्नेटी, राजेवाडी, गणेशवाडी व राजगोळी खुर्द येथील शेतकरी वर्षानुवर्षे कसत असलेल्या इनामी वतनाच्या जमिनी स्वतःच्या नावावर व्हाव्यात, या मागणीसाठी आज चन्नेटी येथे रास्ता रोको आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले. तब्बल तीन तास रास्तारोको आंदोलन केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनग्रस्त शेतकरी आपल्या कुटूंबासह आंदोलनात सहभागी झाले होते. 

जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण यांनी नायब तहसिलदार संजय राजगोळे यांच्यासमोर शेतकऱ्यांची बाजू मांडली. नायब तहसिलदार राजगोळे यांनी वरिष्ठाना याबाबत शेतकऱ्यांची मागणी व भूमिका तात्काळ कळविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 
राजगोळी भागातील आंदोलनग्रस्त शेतकऱ्यांनी इनामदारांच्या वतनी जमिनी वर्षानुवर्षे कसणाऱ्यांच्या नावाने न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 15 मार्च रोजी आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसिलदाराना दिले होते. त्याअनुषंगाने आंदोलन केले.

आंदोलनात महिलांच्यासह मुलांचाही समावेश होता. "मी आंदोलक"नावाच्या टोप्या घालून शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. इनाम वतनाच्या जमिनी वाडवडीलांपासून कसून खात असून सातबाराला त्याप्रमाणे पिकपाणी सदरी नाव दाखल होऊन बऱ्याच लोकांच्या जमिनी वडिलोपार्जित ताब्यात आहेत. परुंतू इनामदार हे सध्या ऑनलाईन सातबाराचा आधार घेऊन वहिवाटदारांना कोणतीही कल्पना न देता परस्पर विक्री करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी नायब तहसिलदार यांनी शेतकऱ्यांची चर्चा करुन माहिती घेतली व वरीष्ठांना याबाबत कळविण्याचा विश्‍वास दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन सहकार्य केले. 

न्याय मिळावा 
जमिनी खरेदी करणारे लोक शेतकऱ्यांशीच वाद घालत असल्याने लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वर्षानुवर्षे जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT