results of Class hsc have been announced in karnatka 
कोल्हापूर

कर्नाटकात बारावीचा निकाल जाहीर ; नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले...

मिलिंद देसाई

बेळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस लांबलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. मात्र यावेळी राज्यात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून 210053 विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत.

शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केल्यानंतर पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहण्याची धडपड विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.

पदवीपूर्व शिक्षण खात्याने बेंगळुरू येथे पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला. यावेळीही मुलींनी निकालात बाजी मारली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची पुन्हा एकदा निकालात घसरण झाली आहे.  राज्यातील 5 लाख 95 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यापैकी 384947 विद्यार्थी पास झाले आहेत मात्र परीक्षा लांबल्याचा परिणाम निकालावर स्पष्टपणे दिसून आला आहे.

मार्च महिन्यात बारावीची परीक्षा पार पडली होती मात्र लॉकडाउनमुळे इंग्रजी विषयाचा  पेपर पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षेचा निकाल लागण्यास अधिक विलंब झाला आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Teacher Recruitment : डीएड, बीएड धारकांसाठी मोठी संधी! 100 दिवसांत 15,000 प्राथमिक शिक्षकांची मेगा भरती; सरकारी शाळांमधील शिक्षकांची 80 हजार पदे रिक्त

Khed Jagbudi River Drowning : मुंबईतून काकाकडे कोकणात सुट्टीला आले, पाच भावांपैकी तीन सख्ख्या भावांचा जगबुडी नदीत बुडून मृत्यू; किनाऱ्यावर दोन भाऊ हताश

मुंबईत आल्यावर गॅरेजमध्ये राहिला, आज कोट्यवधींचं साम्राज्य उभारलं; कोण आहे हा अभिनेता?

Amravati MLC Election: निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का, उमेदवार हर्षजित देशमुख अचानक आजारी, रुग्णालयात दाखल

Gold Rate Drop : सोने ६ हजार तर चांदी१३ हजारांनी उतरली, सोने दिड लाखांच्या आत; अधिकमासात ग्राहकांना दिलासा

SCROLL FOR NEXT