Subhash Herwade sakal
कोल्हापूर

नाट्यमय घडामोडी; सा. रे. पाटील गटाचे सुभाष हेरवाडे सरपंचपदी बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील सरपंच निवडीसाठी दिवसभर नाट्यमय घडामोडी झाल्या. सरपंच पदासाठी सतरापैकी तब्बल बारा सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली; मात्र नाट्यपूर्ण घडामोडीनंतर अकरा जणांनी माघार घेतल्याने सा. रे. पाटील गटाचे बाबासो सुभाष हेरवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी दिलीप गायकवाड यांनी काम पाहिले. निवडीनंतर सत्ताधारी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. सत्ताधारी बाणदार गटाला खिंडार पाडण्यात सा. रे. पाटील गटाची खेळी यशस्वी ठरली. सत्ता सा. रे. पाटील गटाकडे आली.

सरपंच चंद्रकांत चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी सतरापैकी तब्बल बारा सदस्यांनी अर्ज दाखल केले. मात्र सर्वच नाट्यपूर्ण घडामोडीनंतर ११ जणांनी माघार घेतल्याने सा. रे. पाटील गटाचे बाबासो हेरवाडे यांची बिनविरोध निवड झाली.

ग्रामपंचायतीत बाणदार गट, यड्रावकर आणि स्वाभिमानी संघटना एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. सा. रे. पाटील गट विरोधात होता. आघाडीअंतर्गत कार्यकाल संपल्याने सरपंच चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवडणूक लागली होती. सा. रे. पाटील गटाने सावध भूमिका घेत सत्तेतून बाणदार गटाला बाजूला काढण्याची खेळी केली होती. सरपंचपदासाठी १२ सदस्यांनी अर्ज केला होता. माघारीच्या अंतिम क्षणी ११ जणांनी अर्ज माघार घेतल्याने श्री. हेरवाडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहील्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी केली.

चंद्रकांत चव्हाण, उपसरपंच रेश्मा चौधरी, शिवानंद कोरबू , संभाजी कोळी, आरिफ मुजावर, शक्ती पाटील, अनिता मोरडे, शर्मिला टाकवडे, ललिता जाधव, भारती मगदूम, संगीता मगदूम, तेजस्विनी पाटील, संगीता चौताळे, डी. आर. कांबळे, तलाठी रवी कांबळे, जब्बार नालबंद यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

बाणदार यांना धक्का

ग्रामपंचायतीसह विविध संस्थांत बाणदार गटाचे नेते दस्तगीर बाणदार यांचा वरचष्मा आहे. तालुक्याच्या राजकारणात त्यांची भूमिका त्रासाची ठरल्याने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील व गणपतराव पाटील नाराजी होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी सरपंच निवडीत बाणदार गटाला बाजूला ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे नाराजीचा फायदा घेत सा. रे. पाटील गटाने बाजी मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT