कोल्हापूर

Chhagan Bhujbal: "...अन्यथा भुजबळांची हाकालपट्टी करावी"; जालन्यातील सभेवरुन संभाजीराजेंचा सरकारला सवाल

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : जालन्यातील अंबड इथं ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच ओबीसींना देखील जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं आवाहन केलं. पण त्यांच्या या भाषणावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरुन हाकालपट्टी करावी अशी मागणी केली. (Sambhajiraje Chhatrapati sharp criticism on Chhagan Bhujbal for Jalna rally says he should be expelled)

भुजबळ राज्याचं स्वास्थ बिघडवताहेत

संभाजीराजेंनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजाला कोणताही विरोध नसताना केवळ आपलं राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत" (Latest Marathi News)

भुजबळांची हाकालपट्टी करावी

सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे सरकारनं स्पष्ट करावं अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही संभाजीराजेंनी केली. (Marathi Tajya Batmya)

ओबीसींची जालन्यात सभा

मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाची आक्रमक भूमिका यामुळं सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. जरांगे सध्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी आता ओबीसी समाजानं देखील 'ओबीसी आरक्षण बचाव एल्गार' मेळाव्यांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यातील पहिली सभा जरांगे यांच्या होमग्राऊंडवर अर्थात जालना जिल्ह्यात घेण्यात आली. यावेळी त्यांनी घणाघाती भाषण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT