कोल्हापूर

संभाजीराजेंचा राज्यभर दौरा; मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवणार

राज्यभरात ठिकठिकाणी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळवून देण्यासाठी समाजातील कायदे तज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा (maharashtra) करणार असल्याची माहिती खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी आज येथे दिली. छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधी स्थळास त्यांनी आज अभिवादन केले. यावेळी बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.

सर्वोच्च न्यायालयाने (suprime court) मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजात अस्वस्थतेची भावना आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे कोणती भूमिका घेणार याकडे समाजाचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे येत्या २७ मेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackrey) व विरोधी पक्षांशी चर्चा करून मराठा आरक्षणा संबंधीची भूमिका मांडणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन केले. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय,' 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय,' 'मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संयुक्त जुना बुधवार तालमीने संभाजीराजे यांच्या भूमिकेस पाठिंबा देणारे निवेदन दिले.

संभाजीराजे म्हणाले, 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ ला मराठा समाजासह सर्व अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्गीय समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, आज मराठा समाजाला आरक्षण नसल्याने समाजाची हलाखीची स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने समाजात नाराजी पसरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा दौरा करून कायदे तज्ञ व अभ्यासकांशी चर्चा करणार आहे.'

ते म्हणाले, 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापूर नगरी ही पुरोगामी विचारांची आहे. त्याची प्रचिती आज आली आहे. बारा बलुतेदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन राजर्षी शाहू महाराजांवरील कृतज्ञता व्यक्त केली आहे. शाहू राजांच्या घराण्याचा वारसदार म्हणून मला बहुजन समाजाचे कौतुक आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident: अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात! भरधाव बसची १४ गाड्यांना धडक, अनेक जण जखमी

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

Breathalyzer: ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात मोठा बदल! ब्रेथ अ‍ॅनालायझरचा अहवाल अंतिम पुरावा नाही; आता कोणते पुरावे ग्राह्य धरणार?

Sunil Gavaskar: १० हजार धावांचा पहिला बादशाह'... लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचे 'हे' विक्रम आजही कायम चर्चेत

Latest Marathi News Live Update : ट्रिब्युनलच्या परवानगीशिवाय क्रीडा उपक्रम घेण्यास मनाई

SCROLL FOR NEXT