Shocking type again after a year and a half; Increased courage of black traders 
कोल्हापूर

दीड वर्षांनी पुन्हा धक्कादायक प्रकार; काळे धंदेवाल्यांचे वाढले धाडस 

राजेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची जशी चर्चा सुरू झाली, तसे काळे धंदेवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कारवाईवेळी थेट पोलिसांवर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार दीड वर्षांनी पुन्हा घडला. काळे धंदेवाल्यांचे वाढणारे हे धाडस वेळीच मोडून काढण्याची गरज आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर मटका, जुगार, हातभट्टया अशा अवैध धंद्ये मोडून काढले. तत्कालीन प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांनी यादवनगरातील संशयित मुल्लाच्या मटका अड्डयावर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल डॉ. देशमुख यांनी संबधितांवर मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एक दोन नव्हे तर 42 जणांवर मोका अंतर्गत कारवाई केली. शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी कोल्हापुरातील मटक्‍याचे सांगली, सातारा, पुणे, मुंबई, गुजरात कनेक्‍शनचा पर्दाफाश करत काळेधंदेवाल्यांना हादरा दिला. 
कोल्हापूर पोलिस मार्चपासून कोरोना लढाईत अव्याहतपणे काम करत आहे. दैनंदिन कामाबरोबर गुन्हेगारीवर अंकूश, गुन्ह्यांचा तपास आणि सण उत्सवातील शासनाच्या नियमावलीची काटेकोर अमंलबजावणीचे काम करत आहेत. हे काम करताना पोलिसांचा वारंवार नागरिकांचा संपर्क येत असल्याने सुमारे शंभर जणांना कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा महिनाभरापासून सुरू आहे. तसे काळेधंदेवाले सक्रीय झाले. दोन महिन्यात पोलिसांनी मटका, जुगार अड्डावर केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले. सुभाषनगरातील उघड्यावर सुरू असणाऱ्या मटका अड्डयावर कारवाई करताना तिघांनी थेट पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेकीचा प्रकार केला. 


पोलिसांनी दोन महिन्यात केलेल्या कारवाई 
* विक्रमनगरातील महिलांचा जुगार अड्डयाचा पर्दाफाश 
* राजेंद्रनगरात महिलांसह नऊ जणांकडून 20 हजाराचा मुद्देमाल जप्त 
* रिंगरोड फुलेवाडी येथे मोबाईलवर मटका घेण्याचा प्रकार उघड 
* सुभाषनगरातील तीन पानी जुगार अड्डा उद्धवस्त 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: शिवाजी पार्कातील आंदोलकांच्या भेटीसाठी राज ठाकरे दाखल

SCROLL FOR NEXT