PM E-Bus Seva Yojana Ambabai Temple esakal
कोल्हापूर

Ambabai Temple : भाविकांसाठी खुशखबर! आता अंबाबाई मंदिरापर्यंत विशेष शटल बस सेवा होणार सुरू

महापालिकेकडून महसुली खर्चासाठी अर्थसहाय्य म्हणून १९ कोटी अपेक्षित धरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत ई बससाठी तरतूद केली आहे. नवीन वर्षात ताफ्यातील ८५ बसपैकी ७५ बसेस नऊ महिने कालावधीसाठी दैनंदिन सोडण्याचे नियोजन केले आहे.

कोल्हापूर : पीएम ई-बस सेवा योजनेतून (PM E-Bus Seva Yojana) १०० ई-बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर केएमटीतर्फे विविध पार्किंगच्या ठिकाणांहून अंबाबाई मंदिरापर्यंत (Ambabai Temple) विशेष शटल बस सेवा (Shuttle Bus Service) सुरू करण्यात येणार आहे. यासह विविध सुविधांसाठी तरतूद करत परिवहन उपक्रमाकडून सात लाख ५६ हजारांच्या शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

नवीन वर्षात ६४ कोटी ७१ लाख २२ हजार जमा आणि ६४ कोटी ६३ लाख ६६ हजार खर्च, असा ७ लाख ५६ हजारांच्या शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. भांडवली जमा ३५ कोटी २९ लाख १० हजार व भांडवली खर्च ३५ कोटी २७ लाख २० हजार आहे. तसेच महापालिकेकडून महसुली खर्चासाठी अर्थसहाय्य म्हणून १९ कोटी अपेक्षित धरले आहेत.

हे अर्थसहाय्य मिळाले नाही, तर दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार असल्याचे अंदाजपत्रकात मांडण्यात आले आहे. पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत ई बससाठी तरतूद केली आहे. नवीन वर्षात ताफ्यातील ८५ बसपैकी ७५ बसेस नऊ महिने कालावधीसाठी दैनंदिन सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानंतर १०० ई-बससह ११५ बस मार्गस्थ राहतील, असे अपेक्षित धरले आहे.

यापासून प्रवासी तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न, पे ॲण्ड पार्किंग, बसवरील जाहिरात आदी मार्गाने येणारे उत्पन्न महसुली जमेमध्ये धरण्यात आले आहे. नवीन ई-बस मार्गस्थ करणे, त्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करणे, ॲपच्या माध्यमातून आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित करणे, पर्यटक-भाविकांसाठी विविध पार्किंगच्या ठिकाणांपासून अंबाबाई मंदिरापर्यंत विशेष शटल बस सेवा करणे, यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.

महसुली जमा (कोटी रुपयांत)

  • वाहतूक ३२,३९,०९,०००

  • पोषण सरचार्ज २४,१६,०००

  • इतर बाबी ८,८७,४७,०००

  • महानगरपालिका अर्थसहाय्य १९,००,००,०००

  • पीएम ई-बस सेवा प्रकल्पांतर्गत

  • प्रतिकिमीसाठी अनुदान ४,१४,००,०००

महसुली खर्च

  • वेतन खर्च ३३,५०,३०,०००

  • इंधन, बस देखभाल दुरुस्ती ३३,५०,३०,०००

  • मनपा परतफेड, घसारा १,१२,५०,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT