Stone Crusher Business in critical condition 
कोल्हापूर

'या' व्यावसायीतील सत्तावीस हजार मजूर आर्थिक दुष्टचक्रात

अभिजित कुलकर्णी

शिये (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील स्टोन क्रशर व्यवसायिक ३ मे पर्यंत लाॅकडाउन पाळणार आहेत. त्यामुळे या उद्योगासह बांधकाम व्यवसायातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प राहणार आहे. खडी आणि क्रशड् सॅण्ड उपलब्ध होणार नसल्याने  बांधकाम व्यवसायासह क्रशर उद्योगातील सुमारे सत्तावीस हजार मजूर आर्थिक दुष्टचक्रात गुरफटणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.  

कोरोणाचा प्रादुर्भाव व संसर्ग टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने २२ मार्चपासून लाॅकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे क्रशर उद्योग बंद आहेत. खणीकर्म विभागाकडून पाच वर्षे उत्खनन करण्याची परवानगी असणारे सुमारे पन्नास खाण मालक आहेत, तर तहसीलदारांकडून तात्पुरती परवानगी घेऊन दगड उत्खनन करणारे सुमारे पाचशे पन्नास खाण मालक आहेत. बहुतेक खाण मालकांचे क्रशर प्रकल्प आहेत. यामध्ये काही प्रकल्प भागिदारीत आहेत. २० एप्रिल नंतर काही उद्योगांना नियम व अटींच्या अधीन राहून औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर अर्ज करुन परवानगी मिळेल असे खणीकर्म विभागाचे अधिकारी अमोल थोरात यांनी दैनिक सकाळशी बोलताना सांगितले. 

दगड उत्खननात बोअर ब्लास्टिंग, दगड फोडणारे वडार समाजातील मजूर आणि दगड वाहतूक अशा विभागात काम करणाऱ्या मजूरांची संख्या चार हजारांवर आहे. त्यानंतर दगडावर प्रक्रिया करणार्‍या क्रशर आणि क्रशड् सॅण्ड उद्योगात सात हजार मजूर काम करतात आणि येथून पुढे बांधकाम व रस्ते प्रकल्पाचे काम सुरू होते. 

मजुरांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य शासनाने बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. अशीच परवानगी क्रशर आणि खाण व्यवसायालाही आहे. पण परवानगीसाठी प्रशासनाने काही जाचक अटी घातल्यामुळे क्रशर व्यवसायिक ३ मे पर्यंत आपले उद्योग बंद ठेवणार आहेत. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खाजगी आस्थापने बंद करण्याचा आदेश आहे. क्रशर उद्योगात मजूरांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था पूर्वीपासूनच क्रशर व्यवसायिक करतात. पण खडी आणि क्रशड् सॅण्ड वाहतूक करणारे चालक अशिक्षीत असल्याने स्वतःच्या आरोग्याची ते योग्य काळजी घेतील याबाबत शंका असल्याने ३ मे पर्यंत हा उद्योग बंदच ठेवणार आहे.  

-मोहन पाटील,, उपाध्यक्ष : द कोल्हापूर स्टोन क्रशर ओनर्स असोसिएशन   

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बिहारी मजूर होळी साजरी करण्यासाठी गेले आहेत. आणि कर्नाटकी मजूर लाॅकडाऊनच्या सुरवातीलाच चालत आपल्या गावी गेले आहेत. उपलब्ध मजूरांवर काम सुरू करायचे म्हटले, तर सळी, सिमेंट, खडी आणि क्रशड् सॅण्ड मिळत नाही. ज्यांच्याकडे याचा स्टाॅक आहे असे व्यापारी चढ्या दराने हा माल विकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पावसापूर्वीची दुरुस्तीसुध्दा शक्य नाही. अशा परिस्थितीत बांधकाम व्यवसाय पुर्णपणे संकटात सापडला आहे.
विवेक शेटे, लेक्चरर आणि बांधकाम व्यावसायिक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्यात विद्यापीठासमोर नवा उड्डाणपूल… पण कोड्यात पडले चालक... ट्रॅफिकचा नवा पॅटर्न! कुठून जावं, कुठे वळावं?

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारने 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५' लागू केला

Pune LPG Shortage : पुण्यातील रेस्टॉरंट्स अन् हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, मोठे संकट ओढावले; इराण युद्धाच्या शहराला झळा !

Mumbai: मुंबई-नवी मुंबई प्रवास सुसाट होणार! ऐरोली-मुलुंड फक्त १० मिनिटांत, १३८९ कोटींचा उड्डाणपूल; मार्ग कसा आहे?

Banana Export: केळी निर्यात ठप्प; २००० मजूर परतले! इस्राईल आणि इराण युद्धाचा उत्पादकांसह कामगारांना फटका; दर पडल्याने नुकसान..

SCROLL FOR NEXT