Sudha Murty Sakal
कोल्हापूर

Video : ...टिकली, नथ अन् साडी नेसलेल्या सुधा मूर्ती भिडे गुरुजींच्या पाया पडल्या!

सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरातल्या आपल्या जुन्या घरी भेट दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुधा मूर्ती यांनी कोल्हापूरमध्ये आपल्या जुन्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांची भेट घेतली आणि त्यांच्या पायाही पडल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संभाजी भिडे नुकतेच टिकलीसंदर्भातल्या वादामुळे चर्चेत आले आहेत.

इन्फोसिसच्या प्रमुख सुधा मूर्ती काल सांगलीमध्ये होत्या. तिथे एका कार्यक्रमामध्ये त्यांना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे भेटले. त्यावेळी या दोघांमध्ये चार ते पाच मिनिटं चर्चाही झाली. त्यानंतर सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या. त्यामुळे आता सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. यावेळी सुधा मूर्ती मराठमोळ्या पेहरावात दिसल्या. त्यांनी साडी, नथ, तसंच केसांत गजराही माळला होता.

सुधा मूर्ती यांनी कुरुंदवाड इथल्या आपल्या जुन्या घरी भेट दिली. त्यानंतर आपण स्वतःला इथली कन्या मानत असून इथे आल्यावर मला सगळे आपलेसे वाटतात, अशी मनमोकळी प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, संभाजी भिडे गेल्या काही दिवसांपासून वादात आहे. आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन, असं उत्तर त्यांनी साम टीव्हीच्या महिला प्रतिनिधीला दिलं. त्यानंतर त्यांना महिला आयोगाने कारवाईची नोटीसही पाठवली आहे. हा वाद अजूनही ताजाच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काही युजर्सकडून सुधा मूर्ती यांच्यावर टीकाही होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT