jaggery
jaggery  sakal
कोल्हापूर

साखर मिश्रीत गुळाला दराचा फटका

शिवाजी यादव

कोल्हापूर : यंदाचा गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना चांगल्या गुळाला चांगला दर आणि साखर मिश्रीत गुळाला जेमतेम दर मिळत आहे. आवक कमी होत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना हंगाम लवकर संपणार आहे. यंदा साखर मिश्रीत गुळाचे प्रमाण वाढल्याने बाजारपेठेतील गुळाचे दर ३२०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. मूळ कोल्हापुरी गुळाच्या लौकिकाला धक्का बसत आहे. कोल्हापुरी गुळाची उलाढाल कमी होत आहे.

बाजार समिती, व्यापारी, अडते अशा सर्वच यंत्रणांनी लक्ष घालून साखर मिश्रीत गुळाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. येथील शाहू मार्केट यार्डात यंदा साधारण २५ लाख गूळ रव्यांची उलाढाल झाली आहे. हंगाम संपेपर्यंत आणखी चार पाच लाख रव्यांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.

बाजारपेठेत साखर मिश्रीत गुळाचे प्रमाण ७० ते ८० टक्के आहे. अशा गुळाला ३०० ते ७०० रुपये कमी दर मिळतो. ज्या गुळात साखर असते. तो गूळ कठीण होतो. गोडीलाही फरक येतो. रंग उठावदार दिसत असला तरी गुणवत्ता कमी असते. ज्या ग्राहकांना अस्सल गूळ हवा आहे, असे ग्राहक हा गूळ खरेदी करत नाहीत, केला तरी तो कमी दरात खरेदी करतात. गूळ खरेदीत व्यापारी चांगला दर देत नाहीत. अनेक शेतकरी दर चांगला नाही म्हणून गुऱ्हाळे लवकर बंद करीत आहेत. यंदाही जिल्ह्यातील १५० वर गुऱ्हाळ घरात उत्पादन घेतले जाते.

यंत्रणांची अनास्था

गूळ उद्योगाला उभारी देण्यासाठी बाजार समिती, अन्न औषध प्रशासन, कृषी विभाग यांनी सामुदायिक मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. मात्र, एखादी कार्याशाळा होते त्याला काही शेतकरी प्रतिसाद देतात. घरघर लागलेला गूळ उद्योग सावरण्यासाठी कोणी उत्साह दाखवत नाही परिणामी उलाढाल कमी होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होते.

  • यंदा सरासरी उलाढाल - १५० कोटी

  • गूळ रवे आवक - २५ लाख

‘साखर मिश्रण न करता चांगल्या प्रतीचा गूळ बनवणारे काही गूळ उत्पादक आहेत. त्यांच्या गुळाला चांगला दर दिला जातो. गुजरात बाजारपेठेत अन्य बाजारपेठेतून स्वस्तातील गूळ जातो. जास्त दराचा गूळ खपवणे अवघड बनले आहे तरीही कोल्हापुरी गुळाचा लौकिक म्हणून येथील गुळाची खरेदी होते.’

- नीलेश पटेल, गूळ व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT