Tembeswami Maharaj Punyatithi from today in Nrusinhwadi 
कोल्हापूर

नृसिंहवाडीत आजपासून टेंबेस्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव

प्रतिनिधी

नृसिंहवाडी/ कोल्हापूर : येथे उद्या (ता.15) जून पासून परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहे. हा सोहळा 22 जून पर्यंत चालणार असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम टेंबे स्वामी मंदिरात होणार आहेत. यासाठी देवस्थान धर्मशाळेत सोशल डिस्टसिंगचा वापर करून साधारणपणे 25 सेवेकऱ्यांना त्या दर्शन सोहळ्याचा लाभ घेता येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव पुजारी व सचिव गोपाळ पुजारी नियोजन करत आहेत. हा सोहळा सात दिवस चालणार आहे. 
उत्सव काळामध्ये सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये संहिता पारायण व अभिषेक होईल. अवधूत शास्त्री बोरगावकर यांच्यावतीने या पुस्तकाचे पारायण होईल. रुद्रा अभिषेक व पवमान अभिषेक याच प्रमाणे संहिता ग्रंथाचे पारायण होणार आहे. दुपारी बारा वाजता टेंबे स्वामी मंदिरात महापूजा होईल. रोज संध्याकाळी चार ते पाच या वेळेत दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे पुराण होईल. संध्याकाळी पाच ते सात या वेळेत विविध धार्मिक विषयावर कीर्तन होईल. त्यामध्ये पहिले तीन दिवस किर्तनकार विवेक बुवा गोखले यांचे कीर्तन होईल व नंतर चार दिवस शरद घाग यांचे कीर्तन होईल. संध्याकाळी साडेसात वाजता टेंबे स्वामी मंदिरात आरतीचे नियोजन केले असून उत्सव संपेपर्यंत दिगंबरा दिगंबरा याठिकाणी त्याचा जप करण्यात येणार आहे. महाप्रसाद न करता घरोघरी प्रसाद वाटप करण्याचे नियोजन दत्त देवस्थान ट्रस्टच्यावतीने केले आहे. उत्सवाच्या दरम्यान पंचवीस सेवेकऱ्यांनाच त्याचा लाभ घेता येणार असून सोशल डिस्टन्सचा वापर करून शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोकराव पुजारी यांनी दिली. 
नृसिंहवाडीतील ग्रामस्थांना दत्त दर्शन सेवेचा लाभ मिळावा, यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव पुजारी यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांच्याकडे विनंती केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT