House esakal
कोल्हापूर

घराचे स्वप्न महागले : बांधकाम व्यावसायिकांना फटका

कोरोनाचा परिणाम; आयात थांबली, कच्चा माल वधारला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट या वर्षभराच्या कालावधीत झालेले लाकडाऊन आणि इतर देशांतर्गत व जागतिक निर्बंध याचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे, तो अद्याप सावरलेला नाही. या कालावधीत २५ ते ३० टक्क्यांनी बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. मुख्य घटक असलेले स्टील याचे दर दिवसाला बदलत असून इंधन दराप्रमाणे वाढत चालले आहेत

सिमेंटवर २८ टक्के जीएसटी

अति पावसामुळे कोळसा खणीत पाणी साठल्याने होऊन वीज निर्मिती व कोळशावर अवलंबून असलेल्या स्टील व सिमेंट उत्पादनावर परिणाम झाला. १ एप्रिल २०१९ पासून फ्लॅट खरेदवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून जरी ५ टक्क्यापर्यत खाली आणला तरी बांधकाम खर्चावरील जीएसटीचा परतावा (Input Tax Credit) बांधकाम व्यावसाईकाला देण्याचा निर्णय मागे घेतला. हा कर बांधकाम खर्चात समाविष्ट आहे. सिमेंटवर २८ टक्के जीएसटी असल्याने एका बॅगला १०० रुपये जीएसटी भरावा लागतो.

वाळू महागली

शासनाने नदीतील वाळू उपसाबंदी केल्याने कर्नाटकातून वाळू आणावी लागते. कोकणातील खनीज वाळू (सिलिका सँड) जी फौंड्रीसाठी वापरण्यात येते या महागड्या वाळूचा बांधकामात वापर करणे अपरिहार्य झाले आहे.

उद्योगधंदे बंद व नोकरीची शाश्वती नसल्याने घरांची मागणी कमी झाली होती. परंतु सर्वकाही सुरळीत होण्याच्या मार्गावर असून बांधकाम क्षेत्र पुन्हा उभारी घेत आहे. शासनाने उपाययोजना अंमलात आणून साहित्यावरील दरवाढ रोखली पाहिजे अन्यथ: सर्वसामान्यांना घर बांधणे किंवा विकत घेणे आवाक्या बाहेर जाईल.

- प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष क्रेडाई, कोल्हापूर

कारणे काय

  1. कोरोना काळात झालेली वाढ ही आयात बंद झाल्याने रॉ-मटेरियलची टंचाई

  2. डिझेल दरवाढीमुळे ट्रान्‍स्‍पोर्ट खर्च वाढला

  3. ट्रक व रेल्वे अत्यावश्यक सेवेसाठी झाल्याने इमारत साहित्याची वाहतूक थंडावली

  4. मटेरियलअभावी व परप्रांतीय गावी निघून गेल्याने बांधकामे बंद पडली

  5. बांधकामावर अवलंबून असलेल्या २०० उद्योगांना फटका

इतर साहित्य महागण्याची कारणे

  1. अल्युमिनियम चीनहून व ग्लास इराणहून आयात होते. ही आयात थांबल्याने दर वाढले

  2. प्लंबिंग व ड्रेनेजसाठीचे पीव्हीसी पाईप्स, यूपीव्हीसी पाईप्स, सिंटेक्स टाक्या, वॉटरप्रफिंग केमिकल्स आदी रेझीन पेट्रोलियम प्रॉडक्टपासून अरब देशातून येते, याचा तुटवडा

  3. शिपमेंट दरात वाढ व डॉकवर डिलिव्हरी मिळण्यात विलंब

  4. गुजरातमध्ये तयार होणारी सिरॅमिक व व्हिट्रीफाईड टाईल्स हे सर्व प्लँट गॅसवर चालू आहेत, त्यामुळे टाईल्समध्ये १५ ते २० टक्के वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT