Theft occurs in liquor stores in nipani 
कोल्हापूर

मद्यविक्री दुकानदारांची का उडाली झोप ?

राजेंद्र हजार

निपाणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने महिनाभरापासून बंदच आहेत. त्यामुळे घरात साठा केलेली दारूही संपल्याने तळीरामांची गोची झाली आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील शिरगावमधील दारू दुकानच तळीरामांनी फोडले. पण तात्काळ पोलिसांच्या जाळ्यातही ते सापडले. काळ्या बाजारातील जादा दराने मिळणाऱ्या मद्यामुळे सैरभैर झालेल्या तळीरामांनी असे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मद्यविक्री दुकानदारांची झोप मात्र उडाली आहे.

जनता कर्फ्यूपासून सर्वच ठिकाणी लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील दारू दुकाने बंद असल्याने तळीरामांची बेचैनी वाढली आहे. बेकायदेशीर विक्री  करणाऱ्यांकडून जादा दराने ते दारू आणत आहेत.  कामधंदा नसल्याने रक्कमही संपली आहे. त्यातूनच थेट दारू दुकान फोडण्यापर्यंत तळीराम गेले आहेत. शिरगावच्या प्रकरणात  पोलिसांच्या सतर्कतेमुळे  चोरलेल्या ८० हजाराच्या दारूसह तीन जण तात्काळ गजाआड झाले आहे. अबकारी खात्याची बेकायदेशीर दारू विक्रीवर करडी नजर आहे. आता पुन्हा लॉकडाउन वाढण्याच्या भीतीने तळीरामांचा घसा कोरडा पडला असून दुकानदारांची चिंता वाढली आहे. त्यांना सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी लागणार आहे.
 

'दिवसभराच्या बंदोबस्ताबरोबरच शहर आणि ग्रामीण भागातील मद्यविक्री दुकानासमोरही पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. त्यामुळे तळीरामांची अडचण झाली असून अशा घटना टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क केली आहे.'
- संतोष सत्यनायक,
 मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Dahihandi: ९व्या थरावरून गोविंदा कोसळला, मनसेच्या गणेश चुक्कल दहीहंडीत थरारक प्रकार

नॅशनल हायवेवर थांबलेल्या ट्रकला कार धडकून८ इंजिनिअर विद्यार्थ्यांचा मृत्यू; घटनेचा CCTV VIDEO VIRAL

Solapur Ganesh Mandal Electricity : मंडळांना अर्जानंतर २४ तासांत वीज महावितरणकडून ऑनलाइन अर्जाची सुविधा; मिरवणूक मार्गावरही कर्मचारी तैनात

Marathi News Live Updates: अलंकार महिला पीजी कॉलेजमध्ये NEET PG 2026ची पुनर्परीक्षा सुरू, परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा

Nandurbar MBBS Student : नंदुरबारात 'एमबीबीएस'च्या २१ वर्षीय विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT